शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

By | September 17, 2021

Share Market Information In Marathi.

शेअर मार्केट म्हटले की, मराठी माणूस त्यापासून दूर दूर जायच बघतो, Share market शी घाबरतो, share बाजारा चा त्याला न्यूनगंड असतो.

मी म्हणतो जस डॉक्टर झालो तर आपल्याला सर्व प्रथम practice करावी लागते . तेव्हाच डॉक्टर ला ऑपरेशन इतर आजरावरील माहिती होते.

अगदी तसच लोक कोणतीही,माहिती न घेता त्यात पैसा गुंतवता किंवा कोणाच्या तरी म्हणण्या नुसार, सल्यानुसार त्यात पैसे टाकतात.

हे तर , निव्वळ मटका झाला ना ? अस नाही का वाटत तुम्हाला.

पैसा तुम्ही मेहनतीने कमवता आणि त्याचा असा वापर करणे योग्य नव्हे न?

असेच खुप प्रश्न मराठी माणसाच्या डोक्यात घोंगावत असतात.

असो , मराठी माणसाला share market (शेअर बाजार) याची भीती कमी करण्या साठीच मी या लेखा मधे आपल्याला शेअर मार्केट म्हणजे काय ? याबद्दल माहिती  सांगणार आहे.

शेअर मार्केट म्हणजे काय?  What is meant by share market in Marathi

शेअर मार्केट म्हणजे जिथं शेअर ची देवाण घेवाण होते. इथं शेअर घेणारा असतो आणि शेअर विकणारा असतो.

Share Market In Marathi.

आपण यूट्यूब वर माहिती पाहत असताना काही वेळेस तिथे व्हिडीओ बघायला मिळते, जसे की अमुक तमुक व्यक्तीने १० करोड  एवढे पैसे कमविले. 

यातून काही जण लगेच शेअर मार्केट मधे पैसे गुंतवून रातो रात करोडपती चे स्वप्न बघतात. शेअर बाजार संबंधी ज्ञान नसल्यामुळे ते पैसे गमवून, म्हणतात की शेअर बाजार मटका आहे.

“Knowledge Is Power”

खरच शेअर बाजार मटका आहे का ? मग आहे तरी काय ? अनेक वेळा आपण ऐकतो की भाग,तर भाग ( share/Stock) म्हणजे काय?

शेअर ला  मराठी मधे अर्थ “भाग” असे म्हणतात.भाग म्हणजे हिस्सा. चला आपण यासाठी एक उदाहरण पाहुयात, म्हणजे तुम्हाला चांगल अस लक्षात येईल.

मित्रांनो, आता समजा xyz नावाची  एक फार्मा  कंपनी आहे. ती गोळ्या बनवते. तिच्या एक शेअर ची किंमत सध्या २४ रुपये आहे. 

तुम्ही विचार केला की, फार्मा कंपनी आहे, देशाला भविष्यात पण औषधी-गोळ्या  लागणारच आहे,म्हणून तुम्ही त्यात  company चे १००० हजार शेअर घेतले. 

तुम्ही ते शेअर ५ वर्ष डिमॅट (Demate) अकाऊंट ला ठेवले. ५ वर्षा नंतर तो शेअर समजा ८०० रुपये झाला तर तुम्हाला किती पैसे मिळतील ? 

तर तुम्हाला ७,५८,००० निव्वळ नफा होईल. तुम्ही गुंतवले होते फक्त २४,०००हजार रुपये, तर आहे की नाही इंटरेस्टिंग मित्रानो.😍

आपण पैसे देऊन शेअर किंवा भाग विकत घेत असतो.तेव्हा ती कंपनी आपले पैसे घेऊन तिचे प्रॉडक्ट बनवते आणि मार्केट मधे विकते.

या पासून जो नफा मिळतो, तोच नफा ती कंपनी आपल्या भागधारकांना समान वाटप करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की , हे शेअर मार्केट चालत तरी कस ?

प्रत्येक देशाचे इंडेक्स (index) असतात,आपल्या देशाचं पण इंडेक्स आहे. चला तर मग पाहू .

जागतिक शेअर बाजार इंडेक्स.

US            Down Jones
US            FTSE- १००
Germany  DAX
India         Sensex
International Share Index

तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange)  टीव्ही वर ऐकल असेलच.

तर आपण आता या दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज बद्दल माहिती पाहणार आहोत. जे की आपल्या भारत देशा मधे वापरलं जात.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज: What Is Bombay Stock exchange? 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला इंग्रजी मधे “BSE“म्हणजे Bombay Stock exchange अस म्हणल जात.

याची वेबसाईट www.bseindia.com ही आहे. या वेबसाईट वर जाऊन तुम्ही आणखीन या विषयी माहिती पाहू शकता.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची सुरूवात ९ जुलै १८७५ साली झाली. याच मुख्यालय मुंबई इथं आहे.

यामध्ये ५४३९ शेअर लिस्टिंग आहेत. श्री अशिषकुमार चौहान हे याचे MD आणि सीईओ  आहेत. या इंडेक्स मध्ये टॉप ३० कंपन्या असतात 

कोणते कोणते इंडेक्स  बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यामध्ये येतात ?

BSE SENSEX S&P 

BSE SmallCap 

S&P BSE MidCap

S&P BSE LargeCap 

BSE 500

आपण वरती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बद्दल माहिती पाहिली, आता आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज बद्दल पाहणार आहोत. सर्वांचा आवडता विषय निफ्टी फिफ्टी(नोफटी- 50).

नॅशनल स्टॉक एक्सचेंज : National Stock exchange.

 नॅशनल स्टॉक एक्सचेंज ला इंग्लिश मधे Nifty अस संबोधले जात. मित्रानो याची सुरूवात सन १९९२ रोजी झाली. याच मुख्यालय सुद्धा मुंबई मधे च आहे.

श्री विक्रम लिमये  हे याचे MD आणि सीईओ  आहेत.याची वेबसाईट www.nseindia.com ही आहे. यामध्ये टॉप च्या ५० कंपनी असतात.

यामध्ये १९५२ शेअर लिस्टिंग आहेत. जस आपण BSE चे इंडेक्स पाहिले तसच निफ्टी चे सुद्धा इंडेक्स आहेत.चला तर पाहूया.कोणते कोणते इंडेक्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज यामध्ये येतात ?

NIFTY 50

NIFTY NEXT 50

NIFTY 500

NSE and BSE  चे कार्य कार्य आहेत ?

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे गुंतवणूक दार यामध्ये संवाद च दुवा म्हणून कार्य करते.

गुंतवणूकदार ला ट्रेडिंग करायचे समान हक्क पुरवते.

आता आपण माहिती तर घेतली, पण जस आपण पाहतो की  सगळ्या बँक वर नियंत्रण हे देशाची सर्वोच्च रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(Reserve Bank Of India- RBI)  करत असते.   

जसे की , कोणत्या बँक ला परवानगी द्यायची, कोणत्या बँकेची रद्द करायची. तसच मग शेअर बाजार वर नियंत्रण ठेवणार कोण असेल बरं ?

तर मित्रानो यावर देशाची सर्वोच्च संस्था जीचे नाव ” SEBI“सेबी” आहे.

सेबी (SEBI) चा full form आहे – 9Security And Exchange Board Of India)

तर मित्रानो आता आपण पाहूया की सेबी नेमक काय करते.

SEBI ला  Securities and  exchange board of india असे म्हणतात. सेबी ची स्थापना १९८८ साली झाली. याच मुख्यालय मुंबई मधे आहे.

सेबी ची स्थापना  करण्याचा  मुख्य उद्देश हा होता की, शेअर बाजार मधील कामकाज वर नियंत्रण ठेवणे. 

जसे की शेअर मार्केट मधील शेअर खरेदी अथवा विक्री यावर लक्ष आणि पारदर्शकता ठेवणे.

सध्या हर्षद मेहता (Harshad Mehta) Var Ek Chan webseries गाजत आहे, एक छान चित्रीकरण केले आहे त्यात, सर्वानी बघावी अशी आहे.

#Humbaa #HarshadMehta #Scam1992

मित्रानो तुम्हाला माहीत असेल, की काही व्यक्ती अथवा संस्था ह्या एखद्या शेअर मधे  अवास्तव गुंतवणूक करून त्याला वर-वर नेतात, यामध्ये घोटाळा करतात.

तर यापासून गुंतवणूकदाराना  वाचवण्याचे काम सेबी करत असते.

नव्या कंपनी ला सेबी ची परवानगी लागते. तिच्या परवानगी शिवाय ती ( IPO )इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) करूच शकत नाही.

सेबी च मंडळ कस असत. भारत सरकार एक अध्यक्ष नियुक्त करते. रिझर्व्ह बँक चा एक सदस्य भारत सरकार तर्फे ५ सदस्य यात नियुक्त केले जातात. केंद्रा सरकार च्या वित्त मंत्रालयातील दोन सदस्य.

शेअर चे किती प्रकार असतात ? Share Types In Marathi

मित्रानो आपण वरती पाहील की शेअर म्हणजे भाग. पण आता आपण पाहणार आहोत शेअर चे सुद्धा प्रकार असतात.

प्रत्येक शेअर चे प्रकार त्याच्या उद्देश आणि कार्य नुसार पाडले असतात. चला तर मग पाहू.

१) Preferred share 

समजा एका कंपनी ला बाजार मधे काही नवीन प्रॉडक्ट लाँच करायचे असतात,पण त्यांच्याकडे पैसा नसतो,तेव्हा ते कंपनी मधील कर्मचारी वर्गाना हे शेअर देऊन पैसे घेत असतात. 

असे शेअर हे सुरक्षित असतात. कारण कर्मचाऱ्याला माहीत असते की कंपनी ची कंडीशन काय आहे तर.

यामध्ये कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्याला एक फिक्स लाभांश देते. जसे की उदाहरण “५० शेअर चे; कंपनी त्यांना फिक्स २०० रु पये प्रति शेअर लाभांश देते”.

२)बोनस शेअर Bonus Share

समजा एक कंपनी त्यांच्या गुंतवणूक दाराणा ४:१ अस बोनस देते. यामध्ये कंपनी गुंतवणूक दाराला १ शेअर मागे पैसे न देता ४ शेअर फ्री देते.

म्हणजे एखाद्याकडे त्या कंपनी चे  १००शेअर असतील तर कंपनी त्याला वरती ४०० शेअर फ्री देते,म्हणजे  ५०० शेअर त्याचे झाले.

३)कॉमन शेअर  Common Share

कॉमन शेअर कुणी पण घेऊ अथवा विकू शकतो. यामध्ये घेणे अथवा विकणे यात कोणतच बंधन नसत. शेअर घेण्यासाठी डिमॅट खाते कसे ओपन कराल.

How to open Demat account in Marathi. 

मित्रांनो, जर तुम्हाला वरची माहिती पूर्ण समजली असेल आणि आता डिमॅट अकाउंट ओपन करायच असेल तर तुम्ही झेरोधा या प्लॅटफॉर्म वर ओपन करू शकता.

यामध्ये काय असत. तुमचं एक अकाउंट ओपन केलं जात.  त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, बँक च स्टेटमेंट या गोष्टी ऑनलाईन अपलोड कराव्या लागतात.

खाली दिलेल्या लिंक (लिंक) ला क्लिक करून तुम्ही झीरोधा (Zerodha) या प्लॅटफॉर्म वर स्वतःच अकाउंट ओपन करू शकता.

Click This Link – https://zerodha.com/open-account?c=FF0798.

अकाउंट ओपन झाल्या नंतर, तुम्हाला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुमच्या ईमेल वर भेटतो. तो आयडी आणि पासवर्ड तुम्ही झिरोधा अँप (Zerodha App) डाऊनलोड करून त्यात टाका.

आता तुमचं अकाउंट ओपन झालेलं दिसेल. आता तुम्ही हवा तो शेअर विकत घेऊ शकता अणि विकू शकतात.

शेअर बाजार मधील ट्रेडिंग चे किती प्रकार आहेत.

१)इन्ट्रा डे ट्रेडिंग Intra Day Trading

यामध्ये सकाळी ९:१५ पासून ते दुपारी ३:३० पर्यंत तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. समजा तुम्ही इन्ट्रा डे ट्रेड( Intra Day Teade)  घेतला असेल तर तुम्हाला ३:३० वाजेपर्यंत कधी पण विकता येऊ शकतो.

जर तुम्ही तो विकला नाही, तर तो ३:३० ला तुमचे borkerge काढून, त्यात म्हणजे नफा असेल किंवा तोटा असेल त्याच किमतीत विकला जातो. यामध्ये जोखीम खूप असते.

खूप सारे नवीन बांधव इंट्रा डे ट्रडिंग करतात. इन्ट्रा डे ट्रेडिंग साठी अनुभव लागतो. तो नवीन लोकांकडे नसतो, परिणामी लॉस सहन करावा लागतो.

जर तुम्ही नवीन असाल, तर तुम्ही इन्ट्रा डे ट्रेडिंग कमीत कमी ३ वर्ष करू नये.

२) स्विंग ट्रेडिंग Positional trading/ Short term Trading 

स्विंग ट्रेडिंग (Swing Trading) मधे आपण एखादा शेअर एक ते २ दिवस,आठवडा इतके दिवस ठेवतो आणि नफा दिसला की विकतो. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करण्या बाबत इच्छित असाल तर ही ट्रेडिंग करू शकता.

या प्रकाराला स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात.

३) स्कॅपलेर ट्रेडिंग : Scalper Trading

Scalper ट्रेडिंग ला खूप वर्षाचा दीर्घ अनुभव लागतो. ही ट्रेडिंग ५ ते ७ मिनिट मधे करावी लागते. नवीन लोकांनी यापासून दूर राहावे.

लाँग टर्म ट्रेडिंग मधे,तुम्ही हवा  तो शेअर  विकत घेऊन ५ वर्षाने अथवा २० वर्षाने विकू शकता. मित्रानो यात जोखीम कमी असते आणि रिटर्न खूप जास्त असते.

तुम्हाला माहिती आहे का? २०१० साली HDFC Bank ३५० to  ४००  दरम्यान होता. २०२१ साली तो आता २६०० वर आहे. बघा मित्रानो ज्याच्याकडे २०१० ला १०० HDFC चे शेअर असतील आता त्याचे किती पैसे झाले असतील .

मित्रानो शेवटी मला एवढच सांगावस वाटते की, तुम्ही  शेअर बाजार मधे येण्या पूर्वी  शेअर मार्केट चा अभ्यास करावा.

कोणाच्या सांगण्यावरून अथवा टिप्स वर अवलंबून राहू नका.एका रात्री मधे कुणी अंबानी (Dhirubhai Ambani)नसत बनत.

यामध्ये मी खूप लोक पाहिले की ते शेअर मार्केट मधून पैसे कमवतात. तसेच यात बरबाद होणारे सुद्धा खूप लोक आहेत.

कोणती ही गोष्ट करण्या अगोदर ती तुम्ही तपासा,अभ्यास करा आणि जरूर कमवा ना. तुम्हाला कुणी अडवनार थोडीच आहे.

तुम्हाला हा लेख जरूर आवडला असेल. जर तुम्हाला या लेखा विषयी काही सूचना असतील तर जरूर कळवा.धन्यवाद….!

मित्रानो Share Market Information In Marathi, आपल्या मित्रांना हे आर्टिकल जरूर शेअर करा.

Author: Ravi Ugale

Ravi is a Professional Blogger since 2009. he has subtle experience in Content writing, A Certified digital marketer; Which Is course held by "Google". He had 4 years Experience In content writing As Well As Search engine Optimisation.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *