एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय,(Akurdi) आकुर्डी, पुणे येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले यांना उच्च शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन या विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे.
गुणवत्ता प्रशस्तीपत्रक 5 हजार रोख आणि रौप्य पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दि. 5 सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले ह्या गेली 30 वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि मानव्य विद्या शाखेच्या सदस्य म्हणून काम केले आहे.
Talegaon : श्रीरंग कलानिकेतन मध्ये सुश्राव्य गीतांची सुमधून मैफिल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 10 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रा. डॉ. गणपुले यांनी 12 हून अधिक देशांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांनी 7 पुस्तकांचे लेखन, 14 पुस्तकांचे संकलन व 3 पुस्तकांचे भाषांतर केले आहे.
प्रो. डॉ. गणपुले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 14 विद्यार्थ्यांनी पी. एच. डी. आणि एम. फील पूर्ण केले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. नामदार उप मुख्यमंत्री . अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍडव्होकेट. संदीप कदम, रामानंदतीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्राचार्य बेजमी लोबो, उप प्राचार्य . हिरालाल सोनावणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.