Akurdi : माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन


एमपीसी न्यूज – आकुर्डीतील स्टेप्स फाउंडेशनच्या वतीने (Akurdi )माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तसेच 1350 वृक्षांचे देहू आणि आळंदी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कारगील योद्धा रामदास मदने, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संदेश मुखेडकर, रोटरी क्लबचे पिंपरी सचिव संदीप पोलकम, मोरया अकॅडमीचे संस्थापक प्रा.नितीन साळी, संजीवनी डिंबळे, अश्विन गुडसुरकर, अजिंक्य जाधव, ज्ञानसागर स्कूलचे प्रमुख प्रदीप रॉय, नीलम गुप्ता, नरेश सोंडकर, संदीप मिश्रा, डॉ. अमित बेलोकर, डॉ. संतोष पाचपुते, लीतेश घरडे, कमलजीत सिंह, भक्ती मुखेडकर, संदीप मोरे, अभिषेक कुंटुरकर, दीपाली नारगुंडे, दुर्गेश पुराणिक, व्यंकटेश सोमवंशी, मनोज दराडे, ऋषिकेश गुडसुरकर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Chinchwad : आपमध्ये गटबाजी? चेतन बेंद्रे यांच्यानंतर  रविराज काळे यांचीही चिंचवडमध्ये तयारी

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत कारगील योद्धा, 21 माजी सैनिक, नौदल अधिकारी आणि पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आला. याबरोबरच दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पर्यावरण वाचवा’ उपक्रमांतर्गत आळंदी आणि देहू येथे साडेतेराशे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदेश मुखेडकर यांनी सांगितले, की स्टेप्स फाउंडेशन नियमित सामाजिक उपक्रम राबवित आले आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता झाडे लावणे ही काळाची गरज बनली आहे. आम्ही लावलेली झाडे जोपासण्याचीही तितकीच काळजी घेत असतो. लावलेली झाडे वाचली पाहिजेत, याकडे आमचे कटाक्षाने लक्ष असते.