एमपीसी न्यूज -आळंदी ता. खेड जि. पुणे येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन(Alandi) करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होते.त्यासंबंधीत शासन निर्णय झाले आहेत.
शासन निर्णय:-
आळंदी ता. खेड जि. पुणे येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास ” विशेष बाब” म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
Pimpri : शहरात डेंग्यूचे 136, चिकनगुनिया 23, झिकाचे 6 रुग्ण
सदर 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी विहीत पध्दतीने जागा उपल्ब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.
शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१०/इमा-२ दि. २५.०९.२०१९ मधील तरतूदींनुसार अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यात यावेत.
आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे.आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे .रुग्णालयात जास्तीत जास्त आरोग्य सोई सुविधा पुरवण्यासाठी भर दिला जाईल त्यासाठी तसेच आणखी स्थर उंचावण्यासाठी पाठपुरावा करू.सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे.असे यावेळी डॉ. उर्मिला शिंदे म्हणाल्या.