Alandi : आळंदी-पुणे रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवाआधीच पालिका प्रशासनाने बुजवले; नागरिकांनी मानले आभार

[ad_1]

एमपीसी न्यूज : आळंदी मधील देहूफाटा सिग्नल ते (Alandi) धाकटी पादुका पर्यंतच्या आळंदी – पुणे रस्त्यावर ठिकठिकाणी पुन्हा लहान मोठे खड्डे पडले होते. त्या खड्यांमुळे दुचाकी पासून ते चारचाकी वाहनांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. आळंदीमध्ये 29 ऑगस्ट रोजी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळे व शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्या बैठकीत शांतता कमिटी सदस्य संजय घुंडरे यांनी देहूफाटा ते धाकटी पादुका पर्यंतच्या आळंदी – पुणे रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यापासून होणाऱ्या समस्या बाबत माहिती उपस्थित पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना दिली होती. याची पालिका प्रशासनाने दखल घेत आज दि.5 सप्टेंबर रोजी दुपारी आळंदी पुणे रस्त्यावरील खड्डे बुजवले.

गणपती विसर्जनापूर्वी आवश्यकतेनुसार आणखी एकदा GSB टाकण्यात (Alandi) येईल. अशी माहिती यावेळी मुख्याधिकारी यांनी दिली. याबाबत संजय घुंडरे यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच स्थानिक नागरिकांनी सुद्धा पालिकेचे आभार मानले आहेत.

youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo

[ad_2]