एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Alandi) शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि.6 रोजी सकाळी साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान इंद्रायणी नदी घाटावर मॉक ड्रील पार पडले.
यावेळी दंगा नियंत्रक पथक व पोलिसांनी दंग्यावर नियंत्रण आणण्याची विविध प्रात्यक्षिके दाखविली. आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर अचानक पणे गाड्या आल्या. गाडी मधून पोलीस आधिकारी उतरले. हे दृश्य पाहताच इंद्रायणी घाटावरील नागरिक अवाक् झाले.
Metro : गणेशोत्सवात मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, फेऱ्याही वाढणार
त्यानंतर पोलिसांनी प्रात्यक्षिके दाखवणे सुरू केले. यावेळी दंग्यावर (Alandi) नियंत्रण आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पो.आ. मच्छिंद्र शेंडे व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा येथे उपस्थित होते.
youtube.com/watch?v=IOYZxQkal4M