Alandi: आळंदी शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर- कैलास केंद्रे


एमपीसी न्यूज – आळंदी शहर पथविक्रेता समितीच्या एकूण 20 सदस्यांपैकी 8 सदस्य हे शहरातील नोंदणी कृत 365 पथ (Alandi)विक्रेत्यांकडून निवडायचे असून सदर निवडणुकी पूर्वी दिनांक 27 ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद कार्यालयात आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला असून त्यात एकूण 8 जागांपैकी 3 जागा महिला पथ विक्रेत्यां करिता आरक्षित असून त्या अल्प संख्यांक महिलांसाठी 1, इतर मागास प्रवर्ग महिला 1 आणि खुला प्रवर्ग महिला साठी 1 यानुसार निश्चित झाल्याची माहिती मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद तथा निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

Pune : शिवाजीनगर येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदी शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सदर निवडणुका 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहेत.