एमपीसी न्यूज – आज दि.5 रोजी आज दिघी हद्दीतील राहणारी महीला आळंदी इंद्रायणी नदी घाटावरील असलेल्या पुंडलिक मंदीरा जवळ पाण्यात ( Alandi) उडी मारण्याचा प्रयत्न करत असता नदीवरील नागरिकांनी व आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल यांनी त्या महिलेस रोखले व पोलीसांना कळवुन महीलेस त्यांच्या ताब्यात दिले.नदीवरील नागरिकांच्या व आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल यांच्या प्रसंगवधानाने त्या महिलेचे प्राण वाचले आहेत व पुढील दुर्घटना टळली आहे.
Pimpri : शक्तिपीठबाबत सरकार झुकले हे शेतकरी आंदोलनाचे यश – काशिनाथ नखाते
कोणी आत्महत्येचा प्रयत्न करू नये.आपल्या कुटूंबाचा ,कुटुंबातील सदस्यांचा विचार करावा.काही समस्या तक्रारी असल्यास पोलीस प्रशासनास सांगाव्यात.असे एका वृत्त वहिनीमधून पोलीस प्रशासनाने नागरिकांना ( Alandi) आवाहन यावेळी केले होते.