Alandi : बाप्पाला निरोप देताना चिमुकल्याला आले रडू


एमपीसी न्यूज – शनिवार  दि.7 रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे सर्वत्र उत्साहात आगमन झाले.  गणपती बाप्पांचे (Alandi ) काही नागरिक परंपरेनुसार पाचव्या दिवशी विसर्जन करतात. आज पाचव्या दिवशी आळंदीमध्ये नदी पलीकडील पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.या भावनिक क्षणाचे व्हिडिओ छायाचित्रण आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी केले.   त्यांच्या फेसबुक वर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

IMG 20240911 WA0012 1

Pune : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू

  पालिकेच्या वतीने उभारलेल्या संकलन केंद्रावर गणेश भक्त विधिवत पूजा करून हौदामध्ये गणपतीचे विसर्जन करून पालिकेच्या संकलन केंद्रात मूर्ती देतात. मूर्ती संकलन केंद्रामध्ये जमा होते. यामध्येच आज नदीपलिकडील पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर लहान मुलाचे बाप्पांविषयी असलेले प्रेम, श्रध्दा व भावनिक नाते दिसून आले. गणपती बाप्पा विसर्जनावेळी निरोप देताना त्याचा  दुःखी चेहरा होता. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर बाप्पाला निरोप देताना वडिलांच्या कडेवरून तो बाप्पांकडे झेप घेऊन मोठ्याने रडताना दिसत होता. यावेळी त्या लहान मुलाचे  गणपती बाप्पाशी असलेले भावनिक नाते स्पष्ट झाले.शहराती ल जलाशयाचे प्रदूषण रोखण्यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत ता.खेड विभाग व ता.हवेली विभागात मूर्ती संकलन केंद्रे उभारली (Alandi ) आहेत.