Alandi: शहरात गौरी गणपती निमित्त मोठा उत्साह:घरोघरी आकर्षक सजावट व देखावे


एमपीसी न्यूज – गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन (Alandi)झाले. त्या पाठोपाठ मंगळवारी गौरीचे ही मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी होत असते. वेगवेगळ्या फराळांच्या तयारी पासून ते दारातील रांगोळीपर्यंत, घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळते.तसेच गौरी गणपती निमित्त घरोघरी सर्वत्र आकर्षक देखावे सादर करतात तर काही विविध सामाजिक संदेश देतात.

IMG 20240911 WA0030 1

Alandi : आळंदी नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समिती सदस्य निवडणुक यशस्वी रित्या पार

आळंदी मध्ये गौरी गणपती निमित्त आकर्षक असे देखावे सादर करण्यात आले आहे.ढोले कुटुंबायांनी वसुदेव कुटुंबकम हा देखवा सादर केला आहे.यामध्ये देशामधील विविध संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.तर बबनराव कुऱ्हाडे पा. यांच्या कुटुंबीयांनी आकर्षक असा ग्रह तारा मंडळाचा देखावा सादर केला आहे.त्याबाबत माहिती समीर कुऱ्हाडे यांनी दिली.तसेच अमित कुऱ्हाडे यांच्या घरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्राचा हलता देखावा सादर केला आहे.तसेच शहरात घरोघरी गौरी गणपती निमित्त आकर्षक देखावे व सजावट करण्यात आली आहे.