एमपीसी न्यूज – आळंदी मध्ये श्रीकृष्ण प्रतिष्ठाने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन पितळी गणपती समोर,भराव रस्ता येथे (Alandi)केले होते.दहीहंडी फोडण्यासाठी शिवसत्ता ग्रुप, धर्मराज ग्रुप , डीएक्स ग्रुप हे गोविंदा पथक तिथे दाखल झाले होते.त्यापैकी शिवसत्ता ग्रुपने ती दहीहंडी रात्री 9 च्या सुमारास फोडली.यावेळी शिवसत्ता ग्रुपला सन्मानित करून मानचिन्ह व बक्षीस देण्यात आले. तसेच या कार्यक्रमास पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले.
तत्पूर्वी या दहीहंडी निमित्त प्रसिद्ध गाडामालक संतोषशेठ मांडेकर यांचा प्रसिद्ध गाड्याच्या बैलाचा लक्ष्या चा विशेष सत्कार करत मानचिन्ह देण्यात आले.तसेच यावेळी संतोष मांडेकर यांना फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.लक्ष्या ने अनेक घाट गाजवून अनेक बक्षीसे मिळवली आहेत. मांडेकरांचा लक्ष्या म्हणून तो प्रसिद्ध असून सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी पोहचला आहे.
Alandi: आळंदी शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर- कैलास केंद्रे
आळंदी शहरात माऊली पार्क येथे सुद्धा बाल गोपाळ यांनी दहीहंडी भरून गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला.आळंदी शहरात विविध भागात बालगोपाळांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.