Alandi: श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्री कृष्ण जन्मोत्सवा निमित्त माऊलीं मंदिरात दूध वाटप


एमपीसीन्यूज -आज दि.26 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (Alandi)व श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्त माऊलीं भक्तांना माऊलीं मंदिरात दुधाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच आज श्रावणी सोमवार निमित्ताने श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

यावेळी शिव भक्तांना सुद्धा या दुधाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.शिवसेना आळंदी शहर प्रमुख (शिंदे गट)राहुल चव्हाण यांच्या तर्फे या दुधाच्या प्रसादाचे वाटपा चे आयोजन करण्यात आले होते. विश्वस्त योगी निरंजनाथ यांच्या शुभ हस्ते या प्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी सचिन शिंदे, हिरामण तळेकर, किशोर देशपांडे, विनायक महामुनी, दिनकर तांबे, सुयश कदम, व्यवस्थापक माऊली वीर,महादेव पाखरे, प्रकाश तात्या काळे,बल्लाळेश्वर वाघमारे, नितीन ननवरे, आदी उपस्थित होते.