Alandi: संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

[ad_1]

एमपीसीन्यूज -मावळ भाग व धरण क्षेत्र भागात होणाऱ्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या (Alandi)पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग चालू आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रा जवळ असणारे भक्त पुंडलिक मंदिरा मध्ये पाणी शिरले असून तेथील दगडी घाटावरील परिसरात नदी पात्राचे पाणी आले आहे.तसेच भक्त सोपान पुलाला नदी पात्राचे पाणी टेकले असून काहीश्या प्रमाणात उसळ्या मारत त्या पुलावरून पाणी जात आहे.इंद्रायणी नदी घाटावरील भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली आहे. सिद्धबेट जवळील जुन्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.

Pune : वीर गोगादेव उत्सवानिमित्ताने पुणे कॅम्प भागातील वाहतूक वळवली

बाहेर गावा वरून आलेले भाविक इंद्रायणी मातेची पूजा करताना दिसून येत आहेत.तसेच पाणी वाढल्याने नदी घाटावर काही नागरिक फोटो काढताना दिसून येत आहेत.

 

[ad_2]