[ad_1]
एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद शहर फेरीवाला (Alandi) समितीचे निवडणुकी करिता पथविक्रेत्यांचे सोडत पद्धतीने आरक्षण करणे बाबत जाहीर सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
यामध्ये केंद्र शासनाकडील पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ) विक्री विनियमन) अधिनियम 2014 चे मधील कलम 16 च्या पोटकलम (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अ या राजपत्रद्वारे शहरामधील पतविक्रेत्यांबाबत नियम व आदेश प्रसिद्ध केले होते. सदर शासनाच्या नियम व आदेशा मधील प्रकरण 4 मधील कलम 15 भाग – 1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षणाद्वारे नोंदणीकृत पात्र पथविक्रेत्याची यादी तयार करून त्यांची निवडणूक घेणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने असाधारण भाग 4 अ अन्वये एकूण 20 सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पथविक्रेता निवडणूक नियम प्रणाली मध्ये नमूद केलेल्या एकूण 20 सदस्य संख्येमध्ये आठ पथविक्रेता सदस्य असणार आहेत.
Pune Crime : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकावर कोयत्याने वार; दोघांना अटक
सदरचे आठ पथविक्रेता सदस्य पथविक्रेत्यांमधून निवडणुकी द्वारे निवडून (Alandi) द्यायचे आहे. महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने असाधारण भाग चार अ या शासन राजपत्राद्वारे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, इमाव, अल्पसंख्यांक ,विकलांग व्यक्ती या जातीय संवर्गाचा उल्लेख केला आहे.
तसेच 1/3 आरक्षण हे महिलांना देण्यात यावे.असे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने पथविक्रेत्यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करणे कामी सोडत कार्यवाही दि.27 ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद कार्यालय आळंदी येथे दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत होणार आहे. आळंदी नगरपरिषदे कडील शहर पथविक्रेता समितीचे निवडणुकी करिता पथविक्रेत्यांचे सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करणेसाठी ज्या पथविक्रेत्यांची उपस्थिती राहण्याची इच्छा आहे. त्यांनी त्या दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे.
अशी जाहीर सूचना आळंदी नगरपरिषदे कडून देण्यात आली आहे.
[ad_2]