Alandi : आळंदीमध्ये पुणे जिल्हा पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक उत्साहात


एमपीसी न्यूज : मराठी पत्रकार परिषद, मुंबई (Alandi) संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाची मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशा नुसार मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्या सूचने नुसार पुणे जिल्हा पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत एमआयटी इंजिनियरिंग कॉलेज, देहू फाटा ,आळंदी देवाची ,ता. हवेली,जि. पुणे येथे उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीसाठी मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी ,परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, नूतन अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी निवडी नंतर प्रथमच आळंदी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी निवडी निमित्त त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.

IMG 20240906 WA0177

Pimpri : स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डाची आगेकूच; पीएसपीबी, आरएसपीबीप्रमाणे सलग दुसरा विजय

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह पुणे (Alandi) जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष , सचिव व कार्यकारणी पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ओळख पत्र वाटप करण्यात आले. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांनी उत्कृष्ट नियोजन केले. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष , पत्रकार अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले. ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे यांना पत्रकार स्व. सुनील ओव्हाळ यांचे स्मरणार्थ जीवन गौरव पुरस्कार मानपत्र प्रदान करण्यात आले.याबाबत माहिती अर्जुन मेदनकर यांनी दिली.