Alandi: एमआयटी महाविद्यालयात सायफरी 3.0 या शीर्षका खाली आंतर महाविद्यालयीन विविध स्पर्धेंचे आयोजन


एमपीसी न्यूज -आळंदी एम. आई. टी. आर्टस, कॉमर्स आणि( Alandi)सायन्स कॉलेज  येथील सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाने सायफरी 3.0 या शीर्षका खाली आंतर महाविद्यालयीन स्तरावरील विविध स्पर्धेंचे आयोजन केले .यामध्ये ट्रिविया क्विझ, गणेशमूर्तीला, बीजी एमआय, टेक्नो ऍक्ट, ब्लाइंड कोडिंग, वेबसाइट डिझायनिंग, रिसर्च पेपर प्रेझेंटेशन, कॅप्चर द फ्लॅग, ट्रेझर हंट आणि पोस्टर प्रेझेंटेशन या विविध स्पर्धा घेण्यात आल्या .

या स्पर्धा मध्ये पुणे जिल्हयातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धांमध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे विभागातील 21 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. वाय पाटील इन्स्टिट्यूट, फर्ग्युसन कॉलेज, सेंट मीरा कॉलेज,जि एच रायसोनी , हरीभाई व्ही देसाई कॉलेज ,प्रतिभा कॉलेज, तेलंग सीनियर कॉलेज, सरहद कॉलेज , एमआयटी एओई, झील इन्स्टिट्यूट , एआयटी कॉलेज,ये टी एस एस चिंचवड कॉलेज, इंदिरा कॉलेज, इत्यादी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धामध्ये एकूण 1,003 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Chakan : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

या मध्ये त्यांनी त्यांच्या कौशल्यांचे, सांघिकतेचे, नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन केले. या स्पर्धा मुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व सांस्कृतिक सर्जनशीलतेला वाव मिळाला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात . ह्या तीन दिवसीय स्पर्धाचे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री श्रीनिवास, फॉऊंडर मोहालॅब्स तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे, उपप्राचार्या प्रा.अक्षदा कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. संगीता बिराजदार , सर्व विभागांचे प्रमुख, सर्व शिक्षक, विद्यार्थी समन्वयक, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. समारोप कार्यक्रमा साठी श्री साजित खेतानी हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे, उपप्राचार्या प्रा.अक्षदा कुलकर्णी , डॉ. मानसी अतितकर व विभाग प्रमुख डॉ. संगीता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय सायफरी 3.0 सप्ताह 2024 यशस्वीरित्या पार पडला. सायफरी 3.0 मधील स्पर्धाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा.वैभव गलबले, सहसमन्वयक डॉ शर्मिला मोरे व प्रा.शितल शेवकरी, विध्यार्थी सम्वयक श्रेयश नेहरकर आणि तनिष्का भोसले व सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.