[ad_1]
एमपीसीन्यूज -आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत ह. भ. प गुरुवर्य मारूती महाराज कुऱ्हेकर बाबा (Alandi)यांचा 93 वा व रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा 70 अभिष्टचिंतन व गौरव दिन सोहळा पार पडला.या निमित्त कुऱ्हेकर बाबा यांना शांतीब्रम्ह व ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संत परंपरा आपल्याला लाभली आहे. सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमस्कार. महाराष्ट्रातील परंपरेला दंडवत.वारकरी संप्रदाय व संत परंपरा आपल्या महाराष्ट्राचे मराठी संस्कृतीच्या वैभव आहे.त्या जपल्या पाहिजेत व वाढवल्या पाहिजेत.ते आपण करत आहात त्यामुळे मनापासून आपले अभिनंदन.
गुरुवर्य मारुती महाराज कु-हेकर यांचा 93 वा अभिष्टचिंतन सोहळा व रामरावजी ढोक महाराज यांच्या 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त त्यांचे अभिनंदन केले.तसेच जीवन कार्याविषयी,पुरस्कार प्रदान केल्या विषयी माहिती दिली.तसेच सद्गुरू जोग महाराज संस्थेच्या कार्याविषयी मुख्यमंत्री यांनी माहिती दिली.
तसेच मुख्यमंत्री म्हणाले ,आजचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या आयुष्यातील आगळा वेगळा कार्यक्रम आहे.कारण येथे वारकरी संप्रदाय आहे.काही वारकऱ्यांचे येथे पूजन केले वंदन करून सत्कार केले.या वेगळे भाग्य काय असू शकते.
गुरू शिष्यांचा वाढदिवस एकाच वेळी येणे खरोखर योगायोग आहे.बाबांचा तिथी नुसार व ढोक महाराज यांचा तारखेनुसार हा वाढदिवस आहे.या निमित्ताने येण्याचे भाग्य भेटले.वारकरी संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित करणारे या राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारे, सन्मार्गाची दिशा देणारे हे वारकरी पंथीय आहेत.राजकीय अधिष्ठान पेक्षा तुमचं (वारकरी) अधिष्ठान आहे.समाज घडवणारा हा कारखाना आहे.नामस्मरणा मुळे चांगले मनात विचार येतात.चांगले करण्याचे विचार येतात.दृष्ट बुद्धी दूर होते.मोह ,माया,मत्सर यापासून कोसो दूर जातो.
Ravet : सर्विस लिफ्टचा वापर करण्यास सांगितल्याने डिलिव्हरी बॉईज टोळक्याचा पुनावळे मधील सोसायटीत राडा
हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. या दोन वर्षा मध्ये 600 निर्णय घेतले. चांगले निर्णय घेण्यात आले.अनेक निर्णय माझ्या लाडक्या बहिणी योजने खाली दडपले गेले आहेत.या योजनेला बराच कालावधी लागतो. एका दिवसात योजना सुरू होत नाही. मी शेतकरी घरातील मुलगा आहे.मला सर्वसामान्य व गरिबी माहिती आहे.
महिलांसाठी 50 टक्के एसटीच्या सवलतीने एसटी ला फायदा झाला.तोट्यात चालणारी एसटी फायद्यात आली.अतिवृष्टी , अवकाळी गारपीट मध्ये या सरकारने सोळा हजार कोटी नुकसान भरपाई दिली.
शेतकरी सन्मान योजना राज्य सरकार तर्फे पैसे देण्याचे कार्य केले.1 रुपयात पीक विमा योजना निर्णय राज्य सरकारने घेतला.इंद्रायणी प्रदूषण मुक्तीचे कार्य करणार आहोत.तसेच सरकारने घेतले विविध निर्णय माहिती यावेळी मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली.तद्नंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.
या कार्यक्रमावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे,शिवाजी आढळराव होते. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर ,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,मुक्ताई देवस्थान ,अशा विविध संतांच्या संस्थांनचे मान्यवर येथे उपस्थित होते.
[ad_2]