एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात (Bhosari) धरून एका चाळीस वर्षीय नागरिकाला लाथा- बुक्क्याने व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी. (दि.22) सकाळी भोसरी येथे घडली.
याप्रकरणी योगेश सुरेश शिंपी (वय 40 रा दिघी रोड, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिले आहे. फिर्यादीवरून गणेश जैसी (रा. दिघी रोड, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Chinchwad : शेअर मार्केट व आईच्या आजारपणाचा बहाणा करत ज्येष्ठ नागरिकाची साडेएकवीस लाख रुपयांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते. आरोपी व फिर्यादी यांच्यात जुने भांडण होते. या कारणावरून आरोपीने फिर्यादीला माझ्याकडे का बघतोस अशी विचारणा करत शिवीगाळ करणे (Bhosari) सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली व रस्त्यावरील दगड उचलून डोक्यावर व हातावर बाहेर जखमी केले. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.