Bhosari : बुलेटच्या धडकेत महिलेचा मृत्यू


एमपीसी न्यूज – पायी रस्ता ओलांडत असलेल्या (Bhosari) महिलेला भरधाव बुलेटने धडक दिली. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 25) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास पुणे मुंबई महामार्ग, नाशिक फाटा, कासारवाडी येथे घडला.

मुन्नी बेगम वकील अहमद शेख (वय 44, रा. कासारवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिराज मैनुद्दीन शेख (वय 21, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्याधर चंद्रकांत बारटक्के (वय 28, रा. संगमवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : हॉटेल समोर पार्क केलेली कार चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मावशी मुन्नी बेगम (Bhosari) शेख या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर नाशिक फाटा येथे पायी रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव आलेल्या बुलेटने (एमएच 12/व्हीके 9589) त्यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मुन्नी बेगम शेख यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.