Bhosari : कुंडकर पुणेरी यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न


एमपीसी न्यूज – कुंड, तालुका -मलकापूर,जिल्हा-बुलढाणा या गावातील पुण्यात राहणाऱ्या नागरिकांचा श्री आदीशक्ती मुक्ताबाई मंदिर गणेश नगर भोसरी येथे ( Bhosari ) स्नेहसंमेलन मेळावा  संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून झाली.  त्यानंतर राष्ट्रगीत झाले. श्री आदिशक्ती मुक्ताबाई मंदिराचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनतर गावातील मुलींचा व जावाई लोकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मुलींना ब्लाउज पीस व जावाई लोकांना शाल आणि  श्री मुक्ताबाई चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. यामध्ये सर्व मुलींचा परिचय वर्ग घेण्यात आला. यानंतर सर्व गावकऱ्यांचा कुटूंबासोबत परिचय करण्यात आला.

Sindhudurg: मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

तसेच गावातील निधन पावलेले नागरिक व नेपाळ येथे झालेल्या दुर्घनेत निधन झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या वतीने श्री आदिशक्ती मुक्ताबाईची आरती करण्यात आली. पहिल्यांदा असा मेळावा झाल्यामुळे सर्व गावक-यांना अतिशय आनंद बघायला मिळाला. सर्वांची ओळख झाली. पसायदानाने कार्यक्रमाची  सांगता झाली सूत्रसंचालन  मंगेश पाटील ( Bhosari ) यांनी केले.