Bhosari : प्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड यांना पॅरिसच्या द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाची ‘पीएचडी’ पदवी


एमपीसी न्यूज – भोसरी येथील एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेजमधील प्राचार्य डॉ. प्रवीण हिरामण गायकवाड ( Bhosari) यांना पॅरिसच्या द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे.

प्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड यांचा जन्म पुण्यात झाला असून त्यांचे शालेय शिक्षण हे केंद्रीय विद्यालयामधून झाले. ते दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व त्यांना व त्यांच्या पाच बहिण-भावांना त्यांच्या आईने सांभाळले. पाचही बहीण आणि भावांनी सुद्धा उच्च शिक्षण घेतले सर्वांचे शिक्षण झाल्यानंतर सर्वात लहान असलेल्या प्रवीण गायकवाड यांना काही अभ्यासात जास्त मदत मिळाली नाही त्यामुळे ते दहावी झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला लागले. व पुढे काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून झाले.

त्यांना पुढील शिक्षण घ्यायचे होते त्यामुळे त्यांनी नोकरी करत असतानाच बीएड, एमएड पुणे विद्यापीठातून, डीएसएम डी. वाय. पाटील कॉलेज पिंपरी येथून केले.

Talegaon Dabhade:मेंबरशिप सेमिनार मध्ये रोटरी सिटीला सहा पारितोषिके

परंतु शिक्षणाची प्रचंड ओढ असल्यामुळे पीएचडी करायची त्यांची हौस आज पूर्ण झाली. आज त्यांचा शोधनिबंध पूर्ण होऊन ते एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये प्रचार्य या पदावर कार्यरत आहेत. जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून सर्वांना एक आदर्श नागरिक बनविण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे. या कामामध्ये त्यांची अर्धांगिनी भावना त्यांना मदत करत आहेत. त्यासुद्धा ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे एनआयसीयू बाल विभागामध्ये सिस्टर इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. मुलगा प्रतीक हा सुद्धा इंजिनिअर झाला आहे.

प्राचार्य डॉ. गायकवाड यांची ही शैक्षणिक वाटचालीची दखल घेत THE THAMES INTERNATIONAL विद्यापीठ पॅरिस यांनी दखल घेत त्यांना थेट डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून गुरुपौर्णिमेनिमित्त एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये मिसेस एशिया 2022 तसेच मिसेस इंडिया 2021 व New WISDOM INTERNATION SCHOOL च्या संस्थापिका डॉ. सुजाता रणसिंग, डॉ. नितीन मधुकर लोणारी, डॉ. जयश्री सुरवसे तसेच शालेय पदाधिकारी आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी या सर्वांनी डॉ. प्रवीण गायकवाड यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल खूप कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे घरी मित्रवर्ग व नातेवाईक सर्वांनी प्राचार्य डॉ. गायकवाड यांचे खूप अभिनंदन केले.

सदर कार्य करताना संस्थेच्या संचालिका सुनीता पांडुरंग गवळी यांचे मोलाचे सहकार्य डॉ. गायकवाड यांना मिळाले. सुनीता गवळी यांनी देखील डॉ. गवळी यांच्या कार्याचे ( Bhosari) कौतुक केले.