एमपीसी न्यूज – हिंदवी स्वराज्यासाठी मोलाचे योगदान देणारे (Charholi)सरदार दाभाडे घरातील श्रीमंत सुभेदार सरदार कृष्णाजी दाभाडे (सरकार) चऱ्होलीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दाभाडे प्रतिष्ठानने वृक्षारोपण केले.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सागर दाभाडे, सिद्धेश्वर दाभाडे, सुरज दाभाडे, निलेश आवळे, किरण दाभाडे, सुनील गावडे आदी उपस्थित होते.
श्रीमंत सुभेदार सरदार कृष्णाजी दाभाडे (सरकार) चऱ्होलीकर यांच्या 258 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. दाभाडे सरकार यांनी केलेल्या लोकहिताच्या कामांना उजाळा देण्यासाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी चऱ्होली येथील दाभाडे प्रतिष्ठानने सरदार कृष्णाजी दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त वर्षभरात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला.
Chikhali: किरकोळ कारणावरून टेम्पो चालकाला मारहाण
या उपक्रमाची सुरुवात मंगळवारी (दि. 27) चऱ्होली येथे करण्यात आली. वर्षभर चऱ्होली परिसरात वृक्षारोपण करून त्यांची निगा राखण्याचे काम प्रतिष्ठानकडून केले जाणार आहे.