एमपीसी न्यूज – धाराशिव फाऊंडेशनतर्फे (Chinchwad) पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचा येत्या रविवारी (दि.25) स्नेह मेळावा आयोजित केला आहे.
रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे रविवारी दुपारी तीन वाजता हा मेळावा होणार आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या झी-मराठी पुरस्काराने सन्मानित धाराशिवची कन्या कृष्णाई उळेकर यांचे भारुड सादरीकरण होणार आहे.
Hinjawadi : तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक
आपला जीव धाराशिव ही संकल्पना घेऊन सर्व धाराशिव जिल्हावासीयांना (Chinchwad) एकत्रित आणून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे फाऊंडेशन काम करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धाराशिव जिल्ह्यातील लोकांनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन धाराशिव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.