Chinchwad : पीएसपीबी, आरएससीबी उपांत्य फेरीत; सर्व्हिसेस, एफसीआयची निसटत्या विजयासह आगेकूच

[ad_1]

एमपीसी न्यूज : गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (Chinchwad), सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससी), गतवर्षीचे उपविजेते रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत हॉकी महाराष्ट्र आयोजित चौथ्या हॉकी इंडिया आंतर-विभाग राष्ट्रीय उपांत्य फेरीत धडक मारली.

चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने (पीएसपीबी) स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डाविरुद्ध 6-2 असा सहज विजय मिळवला.

पीएसपीबीसह दिवसातील पहिला गोल रोझान मिन्झ (पहिला) केला. त्यानंतर तलविंदर सिंगने (34वे – पीसी., 42वे, 44वे) तीन गोल करताना आघाडी वाढवली. युसूफ अफान (41वे) आणि जगवंत सिंगने (55वे) प्रत्येकी एक गोल केला. स्टील प्लांटकडून सेम मुंडा (11वे – पीसी) आणि अब्दुल कादिरने (29वे – पीसी) गोल केले.

उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लढतीत, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाने भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) संघाला 2-1 ने पराभूत करताना अंतिम चार टीममध्ये प्रवेश केला. सर्व्हिसेसचा मॅच-विनर गोल प्रताप शिंदेने (39व्या) पेनल्टी कॉर्नरवर केला. त्यापूर्वी, सुखदेव सिंगने (तिसर्‍या) सलामीचा गोल केला. त्यानंतर मनीष यादवने (12व्या) पहिल्या सत्रात 1-1 असा बरोबरी साधली होती.

उपांत्यपूर्व फेरीच्या तिसर्‍या सामन्यात रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाने भारतीय क्रीडा प्राधिकरणावर 3-2 अशी मात करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. परदीप सिंगला अंपायर हर्षित अयप्पा यांनी रेड कार्ड मिळाल्यानंतर आरएसपीबीला दुसर्‍या सत्रात 15 मिनिटे 10 जणांसह खेळावी लागली.

शिवम आनंद (3रा) आणि युवराज वाल्मिकीने (19वा) मिळालेल्या संधींचा फायदा घेत आरएससीबीला आघाडीवर नेले. मात्र, पंकजने (8व्या) पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करताना मध्यंतराला त्यांची आघाडी 2-1 अशी कमी केली.

जोगिंदर सिंगने (53वे – पीसी) उत्तरार्धात सुरुवातीला (Chinchwad) आरएससीबीला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. पंकजने (58वे – पीसी) गोल केला तरी साईला निसटता पराभव पाहावा लागला.

Pimpri : कोविड योद्धा महिला बचत गटातील महिलांनी साकारला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देखावा

या सामन्यात परदीप सिंगला (आरएसपीबी) 45व्या मिनिटाला अंपायर हर्षित अयप्पा यांनी रेड कार्ड दाखवले होते.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एफसीआय) पीएनबीवर 2-1 अशी मात करताना उपांत्य फेरी गाठली. परमवीर सिंग (58वे – पीएस) आणि बॉबी सिंग धामी (59वे – पीसी) एफसीसाठी गोल केले. पीएनबीकडून एकमेव गोल गुरसिमरन सिंगने (14वे – पीसी) करताना पहिल्या हाफमध्ये आघाडी मिळवून दिली.

निकाल

उपांत्यपूर्व फेरी पहिला सामना: पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी): 6 (रोसन मिन्झ 1वा; तलविंदर सिंग 34वा – पीसी., 42वा, 44वा; युसूफ अफान 41वा, जगवंत सिंग 55वा) विजयी वि. स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड: 2 (सेम मुंडा 11वा – अब्दुल कादिर 29 – पीसी). मध्यंतर: 1-2

उपांत्यपूर्व फेरी दुसरा सामना: सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससी): 2 (सुखदेव सिंग 3रा; प्रताप शिंदे 39वा – पीसी) विजयी वि. भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग): 1 (मनीष यादव 12वा). मध्यंतर: 1-1

उपांत्यपूर्व फेरी तिसरा सामना: रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी): 3 (शिवम आनंद 3रा; युवराज वाल्मिकी 19वा; जोगिंदर सिंग – 53वा – पीसी) विजयी वि. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई): 2 (पंकज 8वा – पीसी, 58वा – पीसी). मध्यंतर: 2-1

उपांत्यपूर्व फेरी चौथा सामना: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय): 2(परमवीर सिंग 58वे – पीएस, बॉबी सिंग धामी 59वे – पीसी) विजयी वि. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी): (गुरसिमरन सिंग 14वे – पीसी). मध्यंतर: 0-1

[ad_2]