[ad_1]
एमपीसी न्यूज – वर्षभर वाट पाहिल्यानंतर अखेर (Chinchwad) आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आज (शनिवारी, दि. 7) आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात विराजमान झाला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात बाप्पाचे घरोघरी स्वागत करण्यात आले.
शनिवारी सकाळ पासूनच गणेश मूर्तीच्या दुकानांवर भाविकांनी मोठी गर्दी केली. घरातील लहान भाविकांना घेऊन सर्वजण दुकानात गेले. मागील काही दिवसांपूर्वीच सर्वांनी गणेश मूर्ती बुक केली होती. आपली मूर्ती वाजत गाजत आणि आनंदाने आणण्यासाठी बच्चे कंपनीची एकच लगबग दिसली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचे संध्याकाळ पर्यंत आगमन झाले. श्रींची मिरवणूक काढून वाजत गाजत मंडळांनी (Chinchwad) बाप्पा विराजमान केला. पुढील दहा दिवस सर्वत्र आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असणार आहे.
Chakan : चाकण चौक येथील तुळशी वृंदावन जवळचे काही विद्युत दिवे गायब
मागील महिनाभरापासून पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली, दापोडी बाजारपेठा भरल्या होत्या. फुले, फळे आणि पूजेसाठी लागणाऱ्या दुकानांत भाविकांची गर्दी झाली होती तर मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांपासून घरी गणराया घेऊन जाण्यात भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. घरी संपूर्ण कुटुंबांसह अतिशय आनंदाने उत्साहाने गणरायांचे स्वागत करण्यात आले.
[ad_2]