आजकाल सर्वांचे बँकेत अकाऊंट असते बँकेतील व्यवहार अधिक सुकर करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांचा वापर करीत असतो आजकाल तर सर्वच गोष्टी आपल्याला ऑनलाइन मिळतात आणि आपण त्यांना मागवतही असतो अशावेळी आपल्याला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड उपयोगाचे ठरू शकते .
जर आपण डेबिट कार्ड खास करून क्रेडिट कार्ड यांचा वापर केला नाही तर आपण कर्जबाजारी देखील होऊ शकतो म्हणूनच याबद्दल आपल्याला सर्व माहिती असणे खूप गरजेचे आहे बहुतेक जणांना वाटते की डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारखंच परंतु यांचात फरक आहे तो फरक नेमका काय?
Also read:
यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi
फातिमा सना शेख या डोळ्यात भरणाऱ्या आकर्षणाची केंद्रबिंदू झालेली आहे.
वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi
नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.
नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.
मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,
VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.
Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?
क्रेडिट कार्ड कोणासाठी उपयोगाचं?आणि डेबिट कार्ड कोणासाठी फायदेशीर ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील चला तर मग जाणून घेऊयात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड विषयी सर्व काही…..डेबिट कार्ड
ज्यांच बँकेत current account किंवा मग saving account असत त्यांना डेबिट कार्ड मिलत.आजकाल तर सर्वांच बँकेत अकाऊंट असतच म्हणूनच जवळपास सगळ्यांकडे डेबिट कार्ड असत.
डेबिट कार्ड आपल्या बँक खात्याशी संलग्न म्हणजेच जोडलेले असते. जेव्हा आपण एटीएम मशीन द्वारे डेबिट कार्डने पैसे काढतो तेव्हा ते आपल्या बँक अकाउंट मधून कट होतात.
जर आपल्याकडे डेबिट कार्ड असेल तर आपल्याला नेहमी बँकेत जाऊन पैसे काढण्याची गरज भासत नाही बँकेत आपल्याला भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागत नाही त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो. डेबिट कार्डने आपण ऑनलाइन पद्धतीचे सर्व प्रकारचे पेमेंट करू शकतो .
डेबिट कार्ड वापरण्यासाठी बँक आपल्याकडून वर्षाअखेरीस काही सर्विस चार्ज घेत असते ते दर वर्षी आपल्या अकाउंट मधून कपात होत असतात. जर तुम्ही एन्जॉयमेंट मध्ये जास्त पैसे घालवत असावा तर डेबिट कार्ड तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकतो.क्रेडिट कार्ड
तसे आजकाल क्रेडीट कार्ड वापरणे नवीन नाही याचा वापर डेबिट कार्ड सारखाच केला जाऊ शकतो. आपल्या बँकेच्या खात्यात पैसे नसतानादेखील आपण आपले आर्थिक व्यवहार क्रेडिट कार्डच्या मदतीने सुरु ठेवू शकतो.
तसेच जेव्हा अडचणीच्या वेळी जसे की उपचारासाठी जेव्हा आपल्याला पैसे लागतात तेव्हा आपण क्रेडिट कार्ड वापरू शकतो.
क्रेडिट कार्ड आपल्याला बँकच देते असे नाही ते आपल्याला फायनान्स कंपन्या देखील देऊ शकते आपली आर्थिक स्थिती पैशांची देवाणघेवाण यांवरून आपल्याला क्रेडिट कार्ड प्रदान केले जाते एक प्रकारे आपल्याला दिलेले ते कर्जच असते.
त्या कर्जाची परतफेड आपल्याला व्याजासकट करायची असते जर आपण ते करू शकलो नाही ही तर आपल्यावर दंड आकारण्यात येतो.
जेव्हा आपण शॉपिंगला जातो ,फिरायला जातो तेव्हा आपण सर्रासपणे क्रेडिट कार्ड वापरत असतो परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे आपले पैसे नाहीत आणि आपल्याला ते पैसे परत करायचे आहेत म्हणूनच जर तुम्ही एन्जॉयमेंट मध्ये जास्त करत असाल तर तुम्ही क्रेडिट कार्ड न वापरण्यानेच उपयोगाचे असेल.