Dehu: विद्यार्थ्यांनी घेतला एक दिवसीय शिक्षक होण्याचा आनंद


एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या (Dehu) अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून इ. सहावीतील 30 विद्यार्थी आज एक दिवसीय शिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पहिली पासून इ.5 वी च्या वर्गांना ज्ञानदानाचे कार्य करीत शिक्षक होण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. इ. सहावीतील अथर्व माने याने आज एक दिवसीय प्राचार्य तर ऐश्वर्या कवडे हिने उपप्राचार्या होण्याचा कार्यभार सांभाळत शाळेचे कुशल संघटक म्हणून काम पाहिले.

Pimpri : आयुक्त शेखर सिंह यांनी केली विसर्जन घाटांची पाहणी

पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील 72 शिक्षकांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. अशोकराव चासकर, सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ.एस.के.पोतदार, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. आनंद महाजन, सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक प्रा.बी.एस.लावरे, प्रा.आर.बी.नागरे तसेच सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद आदि मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक (Dehu) केले. तर सौरभ कंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo