एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज (सोमवारी) दहीहंडी मोठ्या ( Dehugaon) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य आकर्षण ठरली ती अभंग स्कूलच्या गोविंदा पथकाने थर लावत फोडलेली दहीहंडी!दहीहंडीच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी कृष्ण व राधा यांच्या पारंपारिक वेशभूषेत बोलावण्यात आले होते. इ. 6 वी तील विद्यार्थ्यांनी ‘कृष्ण जन्मला’, वो किशना है’, राधे राधे, ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी’ या गाण्यांवर मनोवेधक समुह नृत्य सादर केले.अभंगच्या इ. तिसरी ते सहावी तील गोविंदा पथकाने चित्तथरारक मनोरा उभारत दहीहंडी फोडली व उपस्थितांची दाद मिळवली.
Dehugaon : चित्तथरराक मनोरा रचत अभंग स्कूलच्या गोविंदांनी फोडली दहीहंडी
पूर्व प्राथमिक विभागातील लहान गोविंदा ही दहीहंडी फोडून यात उत्साहाने सहभागी झाले. इ. पाचवीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, पर्यवेक्षिका शुभलक्ष्मी पाठक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित ( Dehugaon) होता.