Delhi :आतिशी मार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

[ad_1]

एमपीसी न्यूज -आम आदमी पक्षाच्या आमदार आतिशी मार्लेना (Delhi)यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आतिशी यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. आतिशी ह्या दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मद्यधोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर, सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत होती. त्यामुळे, अरविंद केजरीवाल यांनी जामीनावर मुक्तता होताच, आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिली. तसेच, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी मार्लेना यांची निवड केली आहे. त्यामुळेच, आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांचे अभिनंदन केले. त्यावेळी, मुख्यमंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचा पाया पडून आशीर्वाद घेतले. आतिशी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



[ad_2]