हरतालिका उपवासाची माहिती मराठी

By | August 30, 2022

Hartalika puja in marathi

हरतालिका पूजा कशी करावी | Hartalika Puja Vidhi Marathi PDF . हरतालिका पूजा कशी करावी | Hartalika Puja Vidhi Marathi PDF

Interesting facts in Marathi

मराठी सुविचार चांगले सुविचार

Interesting facts in Marathi

मराठी व्यवसाय मूलभूत संकल्पना

मराठी सुविचार चांगले सुविचार

व्यवसाय सुविचार मराठी Part 2

एक चांगली व्यक्ती बनण्याचे मार्ग

तणावपूर्ण परिस्थिती कशी हाताळावी

व्यवसाय सुविचार मराठी

आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे

हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यांत हरितालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत या वर्षी मंगळवारी ३० ऑगस्ट २०२२ रोजी केले जाईल. या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात. साज श्रृगांर करतात. पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिव पार्वतीची प्रतीमा ठेवतात. यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो. रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन किर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात.

भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या राज्यातील महिला हे व्रत दरवर्षी करतात. या लेखातून आपण हरतालिका उपवासाची माहिती मराठी (Hartalika puja in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

Hartalika Pooja Vidhi Marathi PDF | हरतालिका पूजा कशी करावी हरतालिका पूजेसाठी लाल कपडा पसरून आणि भगवान शिव यांची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवा. भगवंताच्या अभिषेकासाठी एक वाटी ठेवा.

यानंतर पांढर्‍या तांदळासह अष्ट कमल बनवून एक खोल कलश लावा. या गोष्टी एकत्र केल्यावर कलशवर स्वस्तिक बनवा आणि ते पाण्याने भरा.

त्यात एक नाणे, सुपारी (सुपारी) आणि हळद घाला. कलशच्या शीर्षस्थानी पाने, सुपारी ठेवा आणि त्यावर तांदूळ आणि एक दिवा भरलेला वाटी ठेवा.

पाच सुपारीच्या पानांवर तांदूळ घाला आणि त्यावर गौरी आणि गणेश मूर्ती स्थापित करा. त्यानंतर पूजा सुरू करा. नंतर देवांना तांदूळ, दूध अर्पण करा. गणपतीला दुर्वा आवडते. सर्व देवांना दीप कलश घाला, त्यानंतर पूजा करा.

हरतालिका पूजा तिथी मराठी माहिती (hartalika date 2022 marathi)

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेस हे व्रत असते. यावर्षी हे व्रत 30 ऑगस्ट 2022 ला आलेले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत असेल. 30 ऑगस्टला सकाळी 06:05 ते 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.

हरतालिका व्रत कथा मराठी मध्ये (hartalika puja katha in marathi)

भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हिमालय राजाची कन्या पार्वती कठोर तपश्चर्या करते. जवळपास 64 वर्ष पार्वतीने हे व्रत केलेलं असतं. हा प्रसंग फार प्राचीन म्हणजेच गणेशाच्या जन्माच्या आधीचा आहे.

राजकन्या ही अत्यंत वैभवामध्ये वाढली. महाराजांच्या सूचनेप्रमाणे हिमालयाने ही कन्या विष्णूला अर्पण करायचं ठरवलं होतं. परंतु, पार्वतीला मात्र, वैभवापेक्षा वैराज्याची ओढ लागली होती. आणि त्यामुळे शिवाला प्रिय असं तिने व्रत केलं.

व्रताची निष्पत्ती अशी झाली की, तिला शीवप्राप्त झालं. असा हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी केलेले हे व्रत आहे.

हिमालयाची कन्या पार्वती हिने जेव्हा राजप्रसादाचा त्याग करून वनाचा स्विकार केला तेव्हा तिला मदत म्हणून तिची मैत्रीण ती पार्वतीबरोबर राहिली आणि पार्वतीला सर्वतोपरी हे व्रत आणि तपश्चर्या करण्यासाठी तिने मदत केली. म्हणून ती पण वंदनीय, पूजनीय मानली जाते.

हरतालिका पूजा साहित्य मराठी (hartalika puja sahitya in marathi)

हरतालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र, 16 प्रकारच्या पत्री, पूजेसाठी फुलं, सौभाग्याचं साहित्य जसे की बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी साहित्य लागते.

याव्यतिरिक्त चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी साहित्याची पूजेसाठी आवश्यकता असते.

Hartalika Sahitya in Marathi | हरतालिका विधी व साहित्य भगवान शिव आणि पार्वतीच्या मूर्ती ठेवण्यासाठी एक छानशी प्लेट चौपायी (देवतांच्या मूर्ती प्लेटवर ठेवण्यासाठी लाकडी व्यासपीठ) चौपाई झाकण्यासाठी स्वच्छ कापड शक्यतो पिवळे / केशरी किंवा लाल. शिव आणि पार्वतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी नैसर्गिक चिकणमाती किंवा वाळू एक नारळ पाण्याचा एक कलश आंबा किंवा पान तूप दिवा अगरबत्ती आणि धूप दिवा लावण्यासाठी तेल कापूर (कपूर). 

हरतालिका कहाणी | हरतालीका व्रताची कहाणी जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, , देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे.

एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं ब्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एकादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक.हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या बापाला फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”

हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, ‘महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही’ असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *