एमपीसी न्यूज – जादा परताव्याचे आमिष दाखवून (Hinjawadi) एकाची सहा लाख 59 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 1 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत जांबे येथे घडली.
याबाबत 44 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विविध बँकेच्या खातेधरकांसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Alandi : भांडणाच्या रागात महिलेने केला इंद्रायणी नदीत जीव देण्याचा प्रयत्न; तरुणाच्या प्रसंगवधानाने वाचले प्राण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे स्वतःचे व पत्नीचे बँक खाते वापरत आहेत. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या अॅपच्या माध्यमातून कमर्शिल प्रोडक्ट खरेदी करण्यास सांगून त्याद्वारे जादा परतावा मिळण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून सहा लाख 59 हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.