Hinjewadi : भर दिवसा दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक


एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील जांबे गावात पार्क केलेली दुचाकी भर दिवसा चोरी करणाऱ्या ( Hinjewadi ) दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. चोरीची घटना 19 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

अक्षय बाबूलाल राकावत (वय 28), मदनलाल छोटूराम देवासी (दोघे रा. जांबे, ता, मुळशी. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भारत सोपान जाधव (वय 53, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/एचएफ 5909) महेश बांदल यांच्या फार्म समोरील रस्त्यावर लॉक करून पार्क केली होती. भर दिवसा आरोपींनी जाधव यांची दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत ( Hinjewadi ) आहेत.