Vima mhanje kay? पिक विमा कधी मिळणार? पिक विमा म्हणजे काय?

बीमा भविष्यामधे संभ्याव येणाऱ्या धोक्याशी लढण्याचा एक प्रभावी हथियार आहे. आपल्याला नाही माहिती की उद्या काय होणार आहे. त्यामुळंच बिमा पॉलीसि चा वापर करून आपण भविष्यामध्ये संभाव्य नुकसानीची भरपाई करतो.

Insurance इन्शुरन्स म्हणजे जोखिमी पासून सुरक्षा. जर insurance company इन्शुरन्स कंपनी ने एखाद्या व्यक्तिचा विमा कधलेला असेल. टर भविष्यामधे त्याला होणाऱ्या संभ्याव नुकसानाची भरपाई विमा कंपनी करेल.

याच प्रकारे विमा कंपनी कस्टमर चे घर, मोबाइल, कार जर फुटला किंवा तुटला असले, किंवा क्षतिग्रस्त झालेले असले तर विमा कंपनी नुकसान झालेल्या व्यक्तीला करारानुसार भरपाई देते.

विमा कंपनी सोबत करार करताना आपल्याला त्यांच्या पोलिसिज लक्षात घ्यायला हव्यात व्यवस्थित विचारपूर्वक त्या पोलिसी वाचायला हव्यात त्यानंतरच कोणत्याही कंपनीची पॉलिसी आपण विकत घ्यायला हव्यात.

विमा म्हणजे विमा कंपनी आणि विमित व्यक्ती यांच्यातील एक करार आहे. या करारानुसार विमा कंपन्या विमित व्यक्ती पासून एक निश्चित धनराशी म्हणजेच प्रीमियम घेत असते आणि याच प्रमाणे विमा कंपन्या पॉलिसीच्या अटीनुसार विमीत व्यक्तीला नुकसान भरपाई देते.

Also Read:

How to verify Aadhaar Number online Marathi how can you know if it is real or fake कोणता आधार नंबर खरा आहे की खोटा? घरी बसल्या कसे ओळखाल?

SBI ने आपल्याला 7 प्रकारचे डेबिट कार्ड उपलब्ध करून दिलेले आहे, या डेबिकार्डमधून आपण दररोज किती पैसे काढू शकतो ते बघुयात.

How to Start Red Chilli Power Business in India In Marathi

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card

यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

टेलिग्राम चे कॉन्टॅक्टस चे नोटिफिकेशन कसे बंद करावे | How to stop telegram from telling you when your contacts join in Marathi

How To Block Someone On Telegram In Marathi|टेलीग्राम वर एखाद्याला ब्लॉक कसे कराल?

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi

विमा (Insurance) किती प्रकारचा असतो?


विमा दोन प्रकार चा असतो 1) जीवन विमा (लाइफ इन्शुरन्स life insurance) 2) साधारण विमा (जनरल इन्शुरन्स General life insurance) भारता मधे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनांचा विमा काढणे कायदाने आवश्यक आहे. जर आपण आपल्या वाहनांना विना विमा काढता, रस्त्यावरून वाहतूक करता. तेंव्हा आपल्याला ट्रॅफिक पोलीस दंड करू शकतात.

1) जीवन विमा (लाइफ इन्शुरन्स life insurance)

जीवन विमा मध्ये एखाद्या माणसाच्या जीवनाचा विमा काढतात. जीवन विमा (Life Insurance) – जीवन विमा याचा अर्थ विमा विकत घेतलेल्या व्यक्तीच्या आकस्मित मृत्यू नंतर त्याच्या परिवाराला विमा कंपनी अटीनुसार पैसे देते. जर परिवारातील मुख्य व्यक्ती याचा अकस्मित मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला मुलांना किंवा आई-वडिलांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी इन्शुरन्स काढणे फार महत्त्वाचे असते वित्तीय योजनांमध्ये व्यक्तीला सर्वप्रथम जीवन विमा म्हणजेच लाइफ इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी सांगितले जाते.

2) साधारण विमा मध्ये वाहन घर पशु कृषी उत्पादन आणि स्वास्थ्य इत्यादींचा समावेश असतो साधारण बीमा (General Insurance)

घराचा विमा होम इन्शुरन्स( Home Insurance) जर आपण विमा कोणत्याही एका साधारण विमा कंपनीकडून करून घेता तेव्हा हा आपल्याला घराची सुरक्षेचे तिची शाश्वती देतो विमा विकत घेतल्यानंतर आपल्या घराला कोणत्याही चे नुकसान झाल्यास विमा कंपन्या त्याची भरपाई देतात. आपल्या घराला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर विमा पॉलिसी यामध्ये आपल्याला सहाय्य करते. यामध्ये घरावर जर नैसर्गिक आपत्ती आली जसे की आग लागल्यामुळे घराचे झालेले नुकसान भूकंप अवकाशातून पडणारी विज तसेच पुरामुळे झालेले नुकसान यामध्ये समाविष्ट झालेले आहे.

3) वाहन विमा मोटार इन्शुरन्स भारतामध्ये रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक वाहनाला कायद्यानुसार विमा काढणे गरजेचे आहे. ( Motor Insurance)

जर आपण वाहनाचा विमा ( Motor Insurance) न उतरवता न काढता आपण जर रस्त्यावर प्रवास करत असू तर आपल्याला प्रेफिक्स पोलीस दंड आकारू शकतो. मोटार वाहन विमा पॉलिसी नुसार वाहनाला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देण्यास बाध्य आहे. जर आपले वाहन हे दुर्घटनाग्रस्त झाले किंवा आपले वाहन चोरीला गेले तेव्हा विमा पॉलिसी कंपनी आपल्याला मदत करत असते. वाहन विमा पॉलिसी चा सर्वात जास्त उपयोग आपल्याला तेव्हा होतो जेव्हा एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला काही लागल्यास किंवा त्याची मृत्यू झाल्यास आपल्याला या विमा कंपन्या मदत करत असतात. Third Party Insurance अंतर्गत कव्हर केल्या जातो. आपल्याकडे जर दुचाकी तीन चाकी किंवा चार चाकी वाहन असेल तर त्यांचा चांगल्या कंपनीच्या विमा कंपनीकडून विमा काढून घेणे गरजेचे आहे.

4) स्वास्थ्य विमा हेल्थ इन्शुरन्स ( Health Insurance)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपचाराचा खर्च फार वाढत आहे देव न करो पण जर कदाचित भविष्यामध्ये आपण खूप आजारी पडला तर स्वास्थ विमा पॉलिसी या आपल्या उपचाराचा सर्व खर्च कव्हर करते. स्वास्थ विमा ( Health Insurance) पॉलिसी नुसार या विमा कंपन्या आपल्या कोणत्याही बिमारीवर होणाऱ्या खर्चाचा मोबदला देते. लक्षात घ्या कि बिमारीवर खर्च होणाऱ्या या पैशांची सीमा हे आपल्या विमा पॉलिसी कंपनीवर निर्भर राहील.

5) यात्रा विमा ट्रॅव्हल इन्शुरन्स यात्रा विमा नुसार प्रवासामध्ये यात्रेमध्ये कोणत्याही व्यक्तीला नुकसान पासून वाचवते. ( Travel Insurance)

जर एखादा व्यक्ती आपल्या कामानिमित्त विदेशामध्ये प्रवास करतो जर त्याला काही लागल्यास किंवा हा जर त्याची सामान हरवल्यास या विमा कंपन्या मदत करतात यात्रा विमा पॉलिसी आपली यात्रा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत वैद्य राहते यात्रा विमा पॉलिसीच्या ( Travel Insurance) अलग अलग विमा कंपन्यांच्या अलग अलग शर्ती व अटी असू शकतात.

6) कृषी उत्पादन विमा क्रॉप इन्शुरन्स ( Crop Insurance)

सध्याच्या नियमानुसार ज्यांनी-ज्यांनी कृषिविषयक लोन घेतलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कृषी विमा ( Crop Insurance) घेणे आवश्यक आहे कृषी विमा पॉलिसी नुसार जर आपल्या पिकांना काही नुकसान झाल्यास या विमा कंपन्या आपल्याला नुकसान भरपाई देते या विमा कंपन्या जर शेतामध्ये आग लागल्यास किंवा पुरामुळे किंवा एखाद्या रोगामुळे शेतामधील पिकांना हानी पोहोचत असेल शेतमालाचे नुकसान होत असेल तर या विमा कंपन्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. परंतु पिक विमा पॉलिसी यांच्या नियम अटी आणि योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी पिक विमा बाबत निरुत्साही आहे प्रत्यक्षामध्ये जर शेतीमधील माळ पिक हे काही कारणामुळे खराब झाले असल्यास विमा कंपन्या आजूबाजूच्या शेतीचा देखील आढावा घेते सर्व करते आणि त्यानंतरच भरपाई देण्यासाठी या कंपन्या तयार होतात.

7) व्यवसाय दायित्व विमा लायबिलिटी इन्शुरन्स लायबिलिटी इन्शुरन्स (Business Liability Insurance)

वास्तूमध्ये कंपनीच्या कामकाज किंवा त्याच्या उत्पादनावर ग्राहकाला जर काही नुकसान झाल्यास लायबिलिटी इन्शुरन्स भरपाई देते. यानुसार कंपनी वर लागणारे दंड किंवा कायद्या नुसार होणारा खर्च हा लायबिलिटी इन्शुरन्स मध्ये येतो आणि हा सर्व खर्च विमा कंपन्या ला उचलावा लागतो.

हा लेख जर आपल्याला आवडला असेल तर कृपया शेअर करा आणि आमच्या वेबसाईटला नेहमी व्हिजीट करत राहा आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा तसेच व्हाट्सअप नंबर वर हाय म्हणून मेसेज पाठवा आपल्याला आमच्या वेबसाईटवरील लेख व्हाट्सअप वर वाचता येतील. धन्यवाद

Whats app number – +917058631176

Telegram Join@humbaa

Categorized in: