Home Marathi Importance Of Holi In Marathi.

Importance Of Holi In Marathi.

18
0
holi marathi

Holi Marathi mahiti, dhuliwandan, rangpanchami

Importance of Holi  होळी चे महत्व

Holi Marathi mahiti, dhuliwandan, rangpanchami

Importance of Holi  होळी चे महत्व

हिंदू संस्कृती मध्ये सणांना अनन्य साधारण महत्व आहे। भारतात जेवढे पण सण आहेत त्या सर्वांना अर्थ आहे, महत्व आहे, आज आपण होळी बद्दल माहिती घेऊयात. 

 शेवटच्या मराठी महिन्या मध्ये म्हणजेच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणार सण म्हणजेच “होळी”

होळी हा रंगांचा सण आहे, हा हिंदूंचा असा सण आहे की ज्यामध्ये फार मजा येते. जाती भेद विसरून सर्व लोक एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात. 

Also read:

Happy Holi 2019: होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

मनसे सदस्य नोंदणी लिंक वर कशी नोंदणी करावी?

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

Moto G30 व G10 होणार लवकरच भारतात लॉन्च.

भारतामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. 

विविध भाषा, चालीरीती, आहार, पोशाख, संस्कृती यामुळे आपला भारत देश हा महान देश बनतो. 

जगामध्ये भारता एवढी विविधता असलेला दुसरा देश नाही. 

आपली विविधता हीच आपली ओळख आहे. हिंदू, मुस्लिम, इसाई, मराठी, कानडी, तेलगू, तामिळ आपण सर्व एक आहोत. 

त्यामुळे राजनीती ला बळी ना पडता, आपली सद्सद्विवेक बुद्धी चा वापर करून आपण सर्वांनी या होळी, धुलीवंदन सणाचा आनंद घ्यावा. 

होळीच्या रंगामध्ये रंगून आपण सर्वांनी उजळून जावे हीच आमची इच्छा आहे.

होळी विषयी माहिती घेण्यापूर्वी, आपल्या सर्वांना Humbaa.com कडून मनपूर्वक शुभेच्छा.😊💐

होळी हा रंगाचा सण आहे. होळी मध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात. 

विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्य यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्व आहे. बंजारा समाजामध्ये, बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात.

होळी सण हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतू च्या सुरवातीला साजरा करतात. 

होळी मराठी 

होळीला विविध राज्यामध्ये वेगवेगळी नावे आहेत. जसे की धुलीवंदन, लाठमार होली, मोहल्ला होला, बसंत उत्सव, रंगपंचमी इत्यादी.

होळी ही कापणीच्या हंगामा आधी साजरी केली जाते. 

पीक हे होळी पर्यंत काढणीला येऊन जातात. बळीराजा(शेतकरी) देवाला चांगले उत्पन्न होऊ देत अशी प्रार्थना करतात.

होळीचे विविध प्रख्यात.

होली हा प्राचीन सण आहे, प्राचीन भारतीय शास्त्र मध्ये जसे की नारद पुरान आणि भविष्य पुराण होळीचा उल्लेख आहे. 

जुन्या चित्रांमध्ये आणि भित्तिचित्रे मध्ये सुद्धा होळी बाबत रेखाटन केलेले आहे. 

होळीबाबत सगळ्यात महत्त्वाचे प्रख्यात हे भक्त प्रल्हाद च्या बाबतीत आहे. 

 चला तर बघुयात भक्त प्रल्हाद आणि होळी चे महत्त्व.

भक्त प्रल्हाद हा दुरातम्यांचा राजा हिरण्यकश्यपू याचा मुलगा होता. इतर राक्षसा प्रमाणे भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा फार दांडगा भक्त होता. 

तो विष्णु ला दिवस रात्र पूजत असे. हिरण्यकश्यपू ला आपल्या मुलाचे विष्णू प्रति भक्ती बघून चीड येत असे . 

हिरण्यकश्यपू ने भक्त प्रल्हाद ला फार समजावून सांगितले की विष्णूची भक्ती सोड म्हणून, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ झालेत. शेवटी हिरण्यकश्यपू ने भक्त प्रल्हाद ला ठार मारण्याचे ठरवले.

हिरण्यकश्यपू ने वेगवेगळ्या युक्त्या वापरून भक्त प्रल्हाद ला मारण्याचे प्रयत्न केलेत, परंतू प्रत्यक्ष वेळेला, विष्णूच्या गूढ अशा शक्तीने भक्त प्रल्हादला वाचवले.

 हिरण्यकश्यपू परत स्वतःच्या बहिणीला म्हणजेच “होलिका“(शेकोटी) ला भक्त प्रल्हादला ठार करण्याचे सांगितले. 

होलिका ला आशीर्वाद दिला, यामध्ये तिला वस्त्र दिलेत, एक शाल दिली त्यामुळे आगी पासून तिचा बचाव होईल. आणि तिला काही इजा होणार नाही. 

त्यानंतर हिरण्यकश्यपू ने होळीकाला, भक्त प्रल्हादला आपल्या मांडीवर बसायला सांगितले. 

परंतु आग जशी जशी उग्र रूप धारण करत गेली, तशी होलिकेची शाल उडून गेली, आणि आगीमुळे ती भस्मसात झाली. 

भक्त  प्रल्हादाचे विष्णू चे नामस्मरण सुरू होते, आणि भक्त प्रल्हाद या आगीमध्ये सुखरूप वाचलेत.

होलिका दहन किंवा होलिका शेकोटी, म्हणजेच होळी, ही वाईट गोष्टीवर विजय प्राप्त होतो मम्हणून साजरा केला जातो.

……

होळीविषयी आणखी एक प्रख्यात आहे, ज्यामध्ये होळीच्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.

प्रख्याता नुसार रंगपंचमी ही वृन्दावन मध्ये सर्वप्रथम बघितल्या गेली.

यामध्ये, देव कृष्ण या राधेच्या गोऱ्या” रंग विषयी मत्सर हेवा करत होता.

देव कृष्णा ने, त्याच्या आईला प्रश्न विचार ला कि आई राधा ही फार गोरी आहे आणि मी का काळा आहे?

यशोदा मातेने बाळ कृष्णा ला चेष्टेने सांगितले, की तू जा आणि राधा ला हव्या त्या रंगात रंगव.

कृष्णा ने तसेच केले आणि तेंव्हापासून ही प्रथा चालत आहे.

अजून एक तिसरी आख्यायिका आहे ज्यामध्ये, देव कृष्णाने, पुतना राक्षस चा वाढ केला, आणि होळी हा सण साजरा करायला लागले.

देव कृष्णा च्या मामला हे माहिती होते की, “देवकीचा आठवा पुत्र हा, त्याचा वध करेल,

म्हणूनच बाळ कृष्णा ला नंद आणि यशोदा यांच्या गोकुळ ला रवानगी करण्यात आली.

मामा, कंस यांनी, कृष्णाला मारण्यासाठी भरपूर राक्षस पाठवले. जेंव्हा पुतना ही राक्षसनी बाळ कृष्णा ला तिचे विषारी दूध पाजत होती, तेंव्हा बाळ कृष्णा ने ती चे पूर्ण आयुष्य पिऊन घेऊन ठार केले.

आणि राक्षसनी पुतना ज्या दिवशी ठार झाली, तो दिवस होळी म्हणून साजरा करतात.

Holi Celebration होळी साजरी करणे

होळी ही दोन दिवस साजरी केल्या जाते, पहिल्या दिवशी होलिका चे दहन केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा रंगपंचमी साजरी केल्या जाते.

Holi Bonfire/ Holika Dahan होळीका दहन 

होलिका दहन या मध्ये एरंड, पाने , डहाळे गौऱ्या आशा ज्वलनशील नैसर्गिक पदार्थांचा वापर करतात. 

संध्याकाळी पवित्र मंत्रांचा जप केल्यानंतर  पवित्र होळी पेटवली जाते. हे आपल्याला देवावर पूर्ण विश्वास याचे  महत्त्व समजावते.

अग्निदेव, याना फुले, धान्य प्रदान करून गोड पद्धर्थांचा नैवेद्य दिला जातो. 

होळीची राख आपल्या कपाळाला लावली तर दुष्ट शक्तीनं पासून आपले संरक्षण होते अशी श्रद्धा आहे . 

त्यानंतर लोक एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात आणि एकमेकांना अलिंगान देऊन होळी मुबारक देखील म्हणतात. 

धूलिवंदन 

धुलीवंदनाच्या दिवशी बाजार हे विविध रंग, पिचकारी यांनी सजलेले असते. राजकीय नेते असोत किंवा सर्वसामान्य जनता होळी/धूलिवंदन हा सर्वांचा आवडता सण  आहे. जुन्या गोष्टी विसरून नव्याने मैत्री करण्याचा हा सण  आहे. 

सर्वात आधी बाळ गोपाळ यांच्या मध्ये हा सन विविध पिचकारी, फुगे , विविध रंग यांनी सुरवात होते. 

धुलिवंदनाच्या दिवशी विविध पदार्थ तयार केले जातात जसे कि चाट पापडी, खीर पुरी, भजे, पुरणपोळी, दही-भल्लास, गुजिया. 

फक्त मुलेच नाही तर मोठी माणसे टोळी ने रंग लावतात, काही ठिकाणी मित्रांना मोठ्या माणसांना शिव्या देखील दिल्या जातात. आणि शेवटी “बुरा ना मनो होळी हैं “ असे म्हणतात.

रात्रीला लोक छान कपडे घालून आपली मित्रांना नातेवाईकांना राग विसरून, अहं भावना विसरून नव्याने सुरुवात करतात

महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात , परंतु २०२० आणि २०२१ मध्ये आपल्यावर कोरोना चे संकट आले . 

होळीचे वेगवेगळे प्रकार 

होळी हि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केल्या जाते. सगळ्यात उत्कंठा वाढवणारी होळी हि, ब्रज याठिकाणी म्हणजेच देव कृष्णा यांनी आपले लहान पण उपभोगलेल्या ठिकाणी , यांच्या मथुरा, वृन्दावन, नांदगाव, बर्सना आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. 

इत्यादी ठिकाणी होळी ची तयारी हि एक महिन्यापासून होत असते. गुलाल, रंगीबेरंगी फुले, मंदिराची सजावट. आदी गोष्टी केल्या जातात. 

बार्सना या गावी , लठमार होळी साजरी केल्या जाते, तिथे महिला या काडीने माणसाला फटके लगावतात.  

देव कृष्ण यांनी आपल्या लहान पणी आपल्या मित्रांबरोबर मोठ्या दही चोरायचे, आणि आपल्या आई यशोदेला त्रास देत असत. 

याच प्रकारची प्रथा हि महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बघायला मिळते. इथे “दही हंडी”  साजरी केल्या जाते . 

उंचच  मानवी मनोरे इथे रचले जातात आणि दही हंडी फोडली जाते. इथे लहान मुले सर्वात वर जाण्याचा प्रयत्न करतात, आणि महिला या त्यांच्या अंगावर पाणी टाकून रोखतात. 

या सर्व खेळामध्ये सर्व जाती धर्म सामील होतात. बंगाल मध्ये या होळीला बसंत उत्सव किंवा ढोल यात्रा म्हणून सम्बोधले जाते. 

शीख लोकांमध्ये, होळीला “हॉल मोहल्ला “ म्हणतात. लोक गुरुद्वारा मध्ये एकतर येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. 

होळी आणि निसर्ग 

होळी आणि निसर्गाचे अनन्य साधारण समंध  आहे तेसू, हिना, हळद, पालक, झेंडू इत्यादी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून रंग तयार केले जातात. 

परंतु आजकाल केमिकल चा वापर करून हानिकारक रंग तयार केले जातात.  हे अनैसर्गिक रंग आपल्या निसर्गाला बाधा अनंत असतात. 

आपली स्वतःची काळजी घेऊन, आपण होळी, धुलिवंदन या सणाचा आनंद घ्या , खुश राहा सर्व चांगले होईल 🙂

Previous articleMoto G30 व G10 होणार लवकरच भारतात लॉन्च.
Next articleHappy Holi 2021 होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!