Jejuri Traffic : सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरी परिसरातील वाहतुकीत बदल 

[ad_1]

एमपीसी न्यूज – पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri Traffic) येथे सोमवारी (दि. 2 सप्टेंबर) श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुणे जेजुरी-बारामती महामार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे (Jejuri Traffic) येणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणे अशी वळविण्यात येत आहे. जेजुरी बेलसर फाटा मार्गावर पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण व साताराकडे जातील.

Pimpri : महापालिका, पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे (Jejuri Traffic) पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस ठाण्याअंतर्गत पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध 2 सप्टेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शिथील राहतील.

To Subscribe MPC NEWS India YouTube Channel Click Here

[ad_2]