Kalewadi : पवना नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; मृतदेह आढळला नाही


एमपीसी न्यूज – काळेवाडी पुलावरून पवना नदीत उडी  (Kalewadi) मारून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी उघडकीस आली. 

Pimpri : शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडूण आणणारच – माजी महापौर कविचंद भाट

याबाबत माहिती अशी की, रविवारी सकाळी काळेवाडी पुलावरून पवना नदीमध्ये (Kalewadi) एका व्यक्तीने उडी मारली असल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार आठ वाजता मुख्य केंद्रातून एक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने दुपारी दोन वाजेपर्यंत नदीमध्ये व्यक्तीचा शोध घेतला. मात्र उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक परतले.