[ad_1]
एमपीसी न्यूज – मनी ट्रान्सफरसाठी लागणारा लॉगिन आयडी परस्पर वापरून त्या (Khed)आधारे वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवत दोन लाख 37 हजार 900 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली.
निबाराम गणेशराम चौधरी (वय 38, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत रामराव राठोड (वय 26, रा. निघोजे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimple Nilkh : रक्षक चौकातील भुयारी मार्गासाठी 40 झाडे तोडणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत राठोड याने फिर्यादी चौधरी यांचा विश्वासघात करून ते वापरत असलेला मनी ट्रान्सफर साठी लॉगिन आयडी त्याच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड करून घेतला. त्यानंतर त्याची पत्नी श्रद्धा संकेत राठोड हिच्या बँक खात्यावर दोन लाख 14 हजार 400 रुपये, मधु विजय गाधाणे यांच्या बँक खात्यावर 13 हजार 500, अंकुश सुरेश राठोड यांच्या बँक खात्यावर 10 हजार रुपये असे एकूण दोन लाख 37 हजार 900 रुपये पाठवून त्या पैशांचा अपहार केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
[ad_2]