[ad_1]
एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा येथे गुरुवारी (Kundamala) (दि. 5) सकाळी एक तरुण व तरुणी पाण्यात वाहून गेले. त्यातील तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. मात्र तरुणी बेपत्ता होती. तरुणीच्या शोधासाठी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अखेर मुलीचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला आहे.
श्रेया सुरेश गावडे (वय 17, रा. चिंचवड गाव), रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे (वय 22, रा. चिंचवडगाव) अशी वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, श्रेया आणि रोहन हे कुंडमळा येथे फिरण्यासाठी आले होते. सेल्फी घेत असताना श्रेया पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी रोहन याने पाण्यात उडी घेतली. मात्र तो तिला वाचवू शकला नाही. दोघेही पाण्यात वाहून गेले.
Pimpri : ‘शहरातील वाहतूककोंडी सोडवा’
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस दाखल झाले. गुरुवारी दुपारी (Kundamala) रोहन याचा मृतदेह काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस शोध मोहीम राबवून तरुणीचा देखील मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले
वन्यजिव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र (Kundamala) लोणावळाचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, राजेंद्र बांडगे, रवी कोळी, शुभम काकडे, सत्यम सावंत, अनिश गराडे, राजु सय्यद, कमल परदेशी तसेच तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाच्या जवानांनी यासाठी परिश्रम घेतले.
[ad_2]