एमपीसी न्यूज – दुचाकीला ओव्हरटेक करताना(Kuruli) अज्ञात वाहनाचा धक्का दुचाकीला लागला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 23) मध्यरात्री एक वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडला.
चंद्रकांत एकनाथ आवटे (वय 31, रा. शेलगाव, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी निलेश कैलास आवटे (वय 33, रा. शेलगाव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Charholi : सरदार कृष्णाजी दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त चऱ्होलीत वृक्षारोपण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत आवटे हे त्यांच्या दुचाकी (एमएच 14/एचबी 9088) वरून पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. कुरुळी गावातील बर्गे वस्ती येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या वाहनाचा धक्का चंद्रकांत आवटे यांच्या दुचाकीला बसला. त्यामध्ये चंद्रकांत आवटे हे रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघात झाल्यानंतर पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.