Lonavala : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सजग रहा; सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या शाळा प्रशासनाला सूचना

[ad_1]

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात ( Lonavala) आहे. शाळा प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिल्या आहेत. सत्यसाई कार्तिकी यांनी लोणावळा परिसरातील सर्व शाळा महाविद्यालय यांचे शिक्षक, प्राचार्य, शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी शाळेत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

 

लोणावळा विभागातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत, वडगाव मावळ या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक शाळा, महाविद्यालयात स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याद्वारे शाळांमधील सर्व गैरप्रकरणांवर  लक्ष ठेवले जात असल्याचे सत्यासाई कार्तिक यांनी सांगितले.

Pimpri :’गोविंदा आला रे आला’च्या जल्लोषात अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत दहीहंडी व कृष्ण जन्माष्टमी साजरी 

 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दिलेल्या सूचना –

 

शाळा, महाविद्यालय परिसरात आवश्यक त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि त्याचे वेळोवेळी मॉनिटरिंग करणे.

 

शाळा, महाविद्यालय परिसरात दर्शनी भागात तक्रार पेटी बसविणे आणि त्यामध्ये येणाऱ्या तक्रारींचे योग्य ( Lonavala) निरसन करणे.

 

शाळा, महाविद्यालय परिसरातील ग्रे एरिया मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे.

 

विद्यार्थी सुरक्षा समिती व समुपदेशन कक्षाची स्थापना करणे.

 

प्रवेशद्वार, बाहेर पडण्याच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे, पीए सिस्टीम बसवून त्याद्वारे विद्यार्थ्यांना सूचना देणे.

 

पोलीस दादा, पोलीस दीदी, निर्भया पथक, पोलीस पेट्रोलिंग याद्वारे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा नियमित आढावा घेणे.

 

शाळा, महाविद्यालयात महिला दक्षता समिती स्थापन करून त्यांच्या मार्फतीने विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेणे.

 

शाळा, महाविद्यालयातील सर्व स्टाफ, वॉर्डन, सफाई कामगार, बस चालक, सुरक्षारक्षक यांची पोलीस पडताळणी करून घेणे.

 

शाळा, महाविद्यालय परिसरातील पान टपरी, दुकाने यांची चेकिंग करणे.

 

शाळा, महाविद्यालयात परिसरात पोलीस पेट्रोलिंग करणे.

 

शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार व बाहेर पडण्याच्या ठिकाणी भटकणारे बाहेरील व्यक्ती व संशयितांची तपासणी करणे.

 

शाळा, महाविद्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करावी. त्याद्वारे सीसीटीव्ही द्वारे संपूर्ण परिसरात नियंत्रण ठेवावे.

 

शाळा, महाविद्यालयात होणाऱ्या अमली पदार्थांच्या सेवनाबाबत संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून त्यांचे ( Lonavala) समुपदेशन करावे.

[ad_2]