Mahalunge : कंपनीमधून साडेतीन लाख रुपयांचे धातूचे तुकडे चोरणाऱ्या कामगारांना अटक

[ad_1]

एमपीसी न्यूज – विश्वासाचा गैरफायदा घेत कंपनी (Mahalunge) मधून साडेतीन लाख रुपयांचे कार्बाईट धातूचे तुकडे चोरणाऱ्या दोन कामगारांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 जानेवारी 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत भांबोली येथील एस के एस फास्टनर्स लिमिटेड युनिट टू या कंपनीत घडली आहे.

दिनेश कुमार (वय 24 भांबोली) व दिलीप सिंग शेखावत (वय 42 रा. भांबोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी फॅक्टरी मॅनेजर नरेश कुमार कुंदनलाल राठी यांनी तक्रार दिली आहे.

Pimpri : बंद बिर्याणी हाऊसमध्ये घरफोडी करत रोख रक्कम चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस के एस फास्ट नर्स लिमिटेड युनिट टू भांबोली या कारखान्यात आरोपी हे कामगार म्हणून काम करत होते. यावेळी फिर्यादी हे फॅक्टरी मॅनेजर म्हणून तिथे काम पाहत होते. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपी (Mahalunge) यांनी मागील सात महिन्यात कार्बाईट धातूचे तब्बल 220 तुकडे चोरून नेले. यावरून आरोपींवर 3 लाख 52 हजार रुपयांचे धातू चोरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही एमआयडीसी महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

[ad_2]