Maharashtra: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल


एमपीसीन्यूज – महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे (Maharashtra)यांच्यासह अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काळ मुंबईतील व्यवसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून संजय पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही असा गुन्हा दाखल झाल्याच्या बातमीस दुजोरा दिला आहे.या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक, संजय पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह ठाण्यातील अधिवक्ता शेखर जगताप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पटेल, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत यशवर्धन अगरवाल, अवनी खंडेलवाल अव्वल स्थानी

तक्रारदार पुनामिया यांनी म्हणाले ,मे 2021 ते30 जून 2024  या कालावधीत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी आपल्याला त्रास दिला आहे. तसेच आरोपींनी ठाणे नगर पोलिसांमध्ये 2016 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. मला आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केसेसच्या धमक्या दिल्या, पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय दंड संहितेच्या 166(अ) 170, 120 ब, 193, 195, 199,203, 205 आणि 209, 352 आणि 355, 384, 389, 465, 466, 471 या कलमांखाली सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट २०२४ रोजी ईमेलद्वारे पुनामिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.