एमपीसी न्यूज – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ( Maharashtra Police Recruitment ) आहे. सध्या चालू असलेली पोलीस भरती सप्टेंबर पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर डिसेंबरमध्ये आणखी साडेसात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
मागील दोन वर्षात राज्यात अनुक्रमे 18000 आणि 17000 पदांची पोलीस भरती घेण्यात आली. दोन वर्षात तब्बल 35 हजार पोलीस शिपाई पदे भरण्यात आली. राज्याची वाढती लोकसंख्या विचारात घेता आणखी पोलीस बळ वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांची भरती राबवली जाणार आहे.
Ambegaon : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा बछडा जेरबंद
डिसेंबर मध्ये राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत मुंबई पोलीस दलात सुमारे 1200 पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील दोन पोलीस भरती मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांना आता नव्या जोमाने तयारी करता येणार ( Maharashtra Police Recruitment ) आहे.