Mangala gauri wishes
Jyeshtha Gauri Pujan Wishes ज्येष्ठा गौरी पूजनाच्या शुभेच्छा

मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय गौराई..

तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली गौराई!
ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो…
आली आली गं गौराई,
माय माझी माहेराला
चला चला गं सयांनो,
ताट घेऊ पुजनाला
तिचं शिण काढूया गं,
तिला जेवू घालूया
तिला भरजरी पैठणीचं,
पदर देऊया
गौरी पूजेच्या शुभेच्छा!

पंच पक्वान्नाचा भोज करू,
सोळा भाज्यांचा नैवेद्य
करुन पूजा आणिआरती,
शेवटी पानांचा विडा करी देऊ
आई भुलचुक मजशी माफ करो,
सुख समृध्दीचे दान पदरी घालो
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Also Read: लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

सर्व मंगल मांगल्ये शिवे
सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते।।

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली
रात जागवली पोरी पिंगा!
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!




