Maval : आमदार शेळके यांना राखी बांधून हजारो भगिनींना साजरे केले रक्षाबंधन


एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रमात ( Maval) हजारो भगिनींनी आमदार सुनील शेळके यांना राखी बांधून यापुढेही सदैव साथ देण्याचे वचन दिले.

ad1

WhatsApp Image 2024 08 23 at 1.18.16 PM 3

वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात मावळ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या व सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक भगिनीची आत्मीयतेने विचारपूस करीत आमदार शेळके यांनी संवाद साधला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जन सन्मान यात्रेत सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, याबद्दल आमदार शेळके यांनी सर्व भगिनींचे आभार व्यक्त केले.

WhatsApp Image 2024 08 23 at 1.18.16 PM 4

“आमदार सुनीलआण्णा शेळके यांनी नेहमीच भावासारखे पाठबळ संघटनेला दिले आहे. प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याला आण्णा नेहमीच ( Maval) सन्मानाची वागणूक देत असतात. त्यामुळे आम्ही भगिनी म्हणून सदैव त्यांच्यासोबत उभ्या राहू,” या शब्दात मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दीपाली गराडे यांनी भावना व्यक्त केल्या.

Pune : प्रविण मसालेवाले ट्रस्टचा सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार अर्णवाझ दमानिया यांना जाहीर

अत्यंत हृद्य वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा घोजगे, कल्याणी काजळे, तेजस्विनी गरुड, सुवर्णा घोलप, वर्षा नवघणे, वनिता मुऱ्हे, ज्योती आडकर, उमा शेळके, छाया ठाकर, वैशाली आहेर, सुवर्णा राऊत, मीनाक्षी शिंदे, उमा मेहता, भाग्यश्री विनोदे, शैलजा काळोखे, अरुणा पिंजण, वैशाली टिळेकर तसेच सर्व सेल अध्यक्षा,गाव अध्यक्षा, पदाधिकारी व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

WhatsApp Image 2024 08 23 at 1.18.16 PM

राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबवित मावळ तालुक्यातील हजारो बहिणींना लाभ मिळवून दिल्याबद्दल उपस्थित भगिनींनी आमदार शेळके यांना ( Maval) धन्यवाद दिले.

WhatsApp Image 2024 08 23 at 1.18.49 PM