Maval : घोरावडेश्वरावर वृक्षप्रेमींचा सन्मान


एमपीसी न्यूज – ऋषिपंचमीचे औचित्य साधून रविवार (दि.8) नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर (Maval)नियमित वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणार्‍या वृक्षप्रेमींचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.

घोरावडेश्वर डोंगरावर नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपणात वड, पिंपळ, कडूलिंब, आंबा, चिंच, फणस, जांभूळ, अर्जुन इत्यादी देशी आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

Pimpri: कर्ज असलेली सदनिका विकून फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्‍हा

या वृक्षारोपणासाठी विशेष सहकार्य करणार्‍या चाकण येथील बॉश कंपनीचे प्लॉन्ट मॅनेजर विनोद व्यंकटेश, श्रीकांत गायकवाड, ओंकार पवार, नियतक्षेत्र वन अधिकारी बेबडओहळचे योगेश कोकाटे तसेच गायकवाड आणि पवार नर्सरीचा कर्मचारीवर्ग यांचा नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. या उपक्रमाच्या संयोजनात नवसंकल्प फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.