एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व बी एम के उद्योग समूह यांच्या वतीने महर्षी कर्वे शिक्षण संस्था कामशेत ( Maval) येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण जपणे व पर्यावरणाची हानी होऊ न देण्यासाठी कार्य करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष रो किरण ओसवाल यांनी केले.
तळेगाव शहरातील उद्योजक बी एम के उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रो. विक्रम काकडे यांच्या सहकार्याने महर्षी कर्वे विद्यालय, कामशेत या ठिकाणी फळझाडांचे वृक्षारोपण करुन ट्रि गार्ड दिले. याप्रसंगी रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Maval : वडगाव मावळ नवीन प्रशासकीय इमारतीस विरधवलराजे यशवंतराव दाभाडे यांचे नाव देण्याची मागणी
तसेच 600 विद्यार्थ्यांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था केली.”माझे झाड ! माझी जबाबदारी” या ब्रीद वाक्य नुसार प्रत्येक वर्गाला पाच झाडांची जबाबदारी दिली व रोटरी सिटी करत असलेल्या कार्याची माहिती अध्यक्ष रो. किरण ओसवाल यांनी दिली.
रो. तानाजी मराठे व रो. संतोष लोणकर याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मयुर भेगडे सूत्रसंचालन रो. प्रदिप टेकवडे यांनी केले. प्रास्ताविक गोरख काकडे यांनी केले तर आभार धनंजय वाडेकर ( Maval) यांनी मानले.