एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी कामशेत ते कान्हे रेल्वे ( Maval) स्थानक दरम्यान घडली.
रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. अज्ञात रेल्वेच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
Narhe : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केला खून
मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. वय अंदाजे 45 वर्ष आहे. मयताची उंची 5.5 फूट असून शरीर बांधा मध्यम, रंग निमगोरा, चेहरा गोल, केस लहान असून अंगात टी शर्ट आणि पँट घातलेली आहे.
वरील वर्णनाच्या व्यक्तिबाबत माहिती मिळाल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले ( Maval) आहे.