Maval : दुर्गसेवकांसाठी मोरया प्रतिष्ठान आयोजित दुर्गसंवर्धन कार्यशाळा


एमपीसी न्यूज : छत्रपती शिवराय (Maval) यांचे गडकिल्ले टिकले पाहिजे या करिता प्रयत्न करणाऱ्या दुर्गसेवकांसाठी मोरया प्रतिष्ठान व सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग पुणे, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गसंवर्धन एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मावळ तालुक्यामध्ये आज प्रथमच दुर्ग संवर्धनाची कार्यशाळा घेण्यात आली होती. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या सहकार्याने आपण दरवेळेस नवनवीन उपक्रम घेत असतो. आपल्या मावळ तालुक्यातील ज्या संघटना गडदुर्गांवरती निस्वार्थीपणे काम करतात त्यासाठीची हि दुर्गसंवर्धन कार्यशाळा भरवण्यात आली होती. यातून दुर्ग संवर्धन कसे करावे व कोणत्या पद्धतीत करावे याची माहिती त्यांना देण्यात आली.

पुरातत्व विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे गडकोटांवर काम करू नका असे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. या कार्य शाळेत मावळ, भिवंडी, सासवड, जुन्नर येथील दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थाच्या सुमारे 100 सभासदांनी सहभाग नोंदविला होता.

यामध्ये डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक डॉ सचिन जोशी आणि राज्य पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे विलास वाहने, शिवाजी ट्रेल संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शिरसागर यांनी पुरातत्व खात्यामार्फ़त चालू असलेली जागतिक वारसा नामांकन प्रचारासाठी चालू असलेल्या मोहिमेबद्दल तसेच दुर्गसंवर्धन चालू कार्यावर विस्तृत माहिती दिल्याने त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वन्य जीव संरक्षण समिती सदस्य सर्प मित्र  जिगर सोळंकी यांनी दुर्गसंवर्धन मोहिमेदरम्यान सर्प दंश झाल्यावर कश्या स्वरूपात मदत करावी. तसेच अनेक गड किल्ल्यांवर वावरणाऱ्या विविध जातींच्या सर्पा विषयी छान माहिती दिली.

यावेळी हाॅटेल मल्हारगड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिवाजी ट्रेल (Maval) संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शिरसागर यांनी आपल्या वडगाव मधील दुर्गसेवक किरण चिमटे यांच्या मातोश्री चिमटे काकू यांना संस्कृती जतन पुरस्कार देऊन सन्मानित केले.

WhatsApp Image 2024 08 19 at 1.37.20 PM 1

Former DGP Sanjay Pandey : माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची मोठी घोषणा

याप्रसंगी गडकिल्ले दुर्ग संवर्धन समितीची सदस्य डॉ. सचिन जोशी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, महाराष्ट्र गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र यादव, नगराध्यक्ष  मयूर ढोरे, शिवाजी ट्रेलचे अध्यक्ष मिलिंद क्षिरसागर, इतिहास अभ्यासक प्रमोद बोराडे, सामाजिक कार्यकर्ते मंगेशकाका ढोरे, वन्य जीव संरक्षण समिती सदस्य सर्प मित्र जिगरजी सोळंकी, सचिन ढोरे, गणेश  जाधव, किरण  चिमटे, नितीन  चव्हाण आणि दुर्ग संवर्धन संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या गेल्यास दुर्गसंवर्धन (Maval) कार्य चांगल्या प्रकारे पार पाडता येईल अशी भावना सर्व दुर्गसंवर्धक संस्था कडून व्यक्त करण्यात आली. अतिशय अभ्यासपूर्ण वातावरणात दुर्गसंवर्धन कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर आमच्या मोरया प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सहकारी बांधवांसाठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.