Metro : गणेशोत्सवात मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, फेऱ्याही वाढणार


एमपीसी न्यूज – गणेशोत्सवात (Metro) पुणे मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार आहे. मेट्रोच्या फे-याही वाढविल्या जाणार आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिनांक 17 ते 18 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत असे 24 तास मेट्रो सेवा अखंड सुरु असणार आहे. 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान  या दोन दिवसात मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरु असेल.

10 ते 16 सप्टेंबर  या दिवसात मेट्रो सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत सुरु असेल. 18 सप्टेंबर रोजी मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 10 अशी नियमित सुरु असणार आहे. म्हणजे दिनांक 17 सप्टेंबर सकाळी 6 ते 18 सप्टेंबर  रात्री 10 अशी मेट्रो सेवा अखंड 40 तास सुरु असणार आहे.

 मेट्रोच्या प्रवासी सेवेची वेळ प्रवासी सेवेचे एकूण वेळ (Metro)

7 ते 9 सप्टेंबर सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत
10 ते 16 सप्टेंबर सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत
17 ते 18 सप्टेंबर सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत

youtube.com/watch?v=IOYZxQkal4M